कोंढाळी -जुनापानी -चाकडोह येथून वर्धा जिल्ह्यात दारू पुरवढाउत्पादन शुल्क व पोलीस विभाग कोमात -अवैध दारू पुरवढा जोमात!!

काटोल -प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
परवानाधारक देशी दारू चे विक्रेत्यांनी कोंढाळी व लगतच्या कारंजा (घा),सेलू तालुक्यातील काही युवकांना हाताशी धरून अनेक गावो गावी अवैध दारू विक्री चे धंदे सुरू आहेत.

या बाबतीत जिल्हा उत्पादन शुल्क विभाग यांच्या कडे समाज माध्यमातून तक्रारी केल्या गेल्या आहेत . मात्र त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, उलट ग्राहक हक्क संरक्षण कायद्याचे उल्लंघन केले जाते.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील नागपूर – अमरावती महामार्गावरील कोंढाळी पासून आठ किलोमीटर अंतरावरील जुनापानी तसेच चाकडोह गावाचे हद्दीत असलेल्या परवाना व बिन परवानाधारक देशी दारू व बियर बार संचालका कडून रात्री पाळीत दारू बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा, कारंजा (घा) तालुक्यातील अनेक गावांत देशी व विदेशी तसेच नकली दारू सुद्धा पुरविल्या जात असल्याचे तक्रारी आहेत. देशी दारू ची ७५०एम एल,१८०एम एल व ७०एम एल चे बाटली बंद दारू छापील किमतीपेक्षा२५रू,
२० रू,,व१५रूज्यादा दराने विक्री होते आहे.
या बाबतीत उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार करूनही सब कुछ आलं ईज वेल सुरू आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोंढाळी नागपूर महामार्गावरील चाकडोह येथे तर हाटेल, किराणा, पानटपरी वर अवैध दारू विक्री होत आहे. यात महिला ही दारू विक्रीत सहभागी आहेत.



