Uncategorized

ता.करमाळा शाखा कोर्टी बँक ऑफ ईडिंया शाखा कोर्टीच्या शाखाप्रमुख राहुलजी तळेकर साहेब यांच्या प्रयत्नाला यश थकीत कर्जमुक्त गाव योजनेत राजुरी अव्वल

पोलीस की आवाज न्यूज प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सहसंपादक

बँक ऑफ इंडियाच्या सोलापूर विभागाचे झोनल श्री लग्नजीत दास यांच्या मार्गदर्शनाखाली थकीत कर्जमुक्त गावही योजना आणली होती बँक ऑफ इंडियाच्या कोर्टी तालुका करमाळा शाखेच्या कार्यक्षेत्रातील गावांपैकी एक गाव असणाऱ्या राजुरी गावात बँक ऑफ इंडिया ने नऊ कोटी सहा लाख 63 हजार रुपयांचे कर्ज वाटप केले होते त्यापैकी फक्त 70 लाख कर्ज थकीत होते बँक ऑफ इंडियाच्या कोटी शाखेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या अवाहनाला प्रतिसाद देऊन राजुरी तील कर्जदार शेतकऱ्यांनी थकीत असणारे 70 लाख रुपये कर्ज भरले आहे बँकेच्या या नियमानुसार राजुरी हे एकमेव गाव थकीत कर्ज मुक्त एन पी ए झाले आहे या कामी बँकेच्या सोलापूर विभागाचे झोनल मॅनेजर श्री लग्नजीत दास यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली विभागाचे वरिष्ठ प्रबंधक श्री महेंद्र मोराळे बँक ऑफ इंडिया कोर्टी शाखेचे बँक मॅनेजर श्री राहुल जी तळेकर साहेब व बँक मित्र गणेश दिगंबर जाधव यांच्या प्रयत्नाने हे गाव एन पी ए मुक्त झाले आहे,
राजुरी हे गाव एन पी ए मुक्त झाल्यामुळे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्या समवेत लवकरच राजुरी गावात सर्व कर्जदार शेतकऱ्यांचे अभिनंदनचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, भविष्यकाळात राजुरी गावातील बचत गट किसान योजना पीक कर्ज योजना या सर्व योजने खाली शेतकऱ्यांनी कागदपत्राची पूर्तता केल्यास त्यांना तात्काळ कर्ज पुरवठा केला जाईल राहुलजी तळेकर साहेब शाखा व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया कोर्टी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button