क्राइम

अवैधरित्या रेती वाहतूक ट्रेक्टर वर पवनी पोलीस स्टेशन द्वारे जप्तीची कारवाई

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खातखेडा गावातील वैनगंगा नदी पात्रातून संगनमताने रेतीचे अवैधरित्या उत्खनन करुन दोन ट्रँक्टर मध्ये रेती भरून चोरी करतांनी मिळुन आले तसेच चार ट्रँक्टर रेती चोरी करण्याच्या उद्देशाने वैनगंगा नदीच्या पात्रात बिना नंबर ट्रँक्टर ट्रालीसह मिळुन आले.त्यानंतर सहाही ट्रँक्टर वर कारवाई करुन ट्रँक्टर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

सहा ट्रँक्टर व रेती असी एकूण किंमत ३०लाख१०हजार रुपयांचा मुद्दे माल जप्ती केला व कलम ३७९,५११,३४भा.द.वि.५०(१)cmvr/१७७मोवा का. गुन्हा नोंद करण्यात आला.

मा.लोहित मतानी ,पोलीस अधीक्षक भंडारा आणि ईश्वर कातकडे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली

मा.ठानेदार नरेंद्र निस्वादे, पोलीस उपनिरीक्षक हारगुडे, गजानन मस्के, नितीन खराबे, निगेश राठौर यांनी अवैध रेती ट्रँक्टर जप्ती मारण्यास सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button