देश के प्रजातंत्र का चौथा पैया पत्रकारिता- पूर्व सांसद खुशाल बोपचे तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघ

संजीव भांबोरे
भंडारा (आल इंडिया प्रतिनिधी ) जिल्ह्यात ११७ चालक व शिपाई पदांची भरती मंगळवारपासून सुरू झालेली आहे. महाराष्ट्रातून तरुणाई भंडाऱ्यात दाखल झालेली आहे. एवढ्या तरुणांना जेवणाची व्यवस्था शहरात हॉटेल व्यावसायिकाच्या माध्यमातून होणे जिकिरीचे होऊ शकते. सुशिक्षित तरुणांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पूर्ण करण्याकरिता आपलाही खारीचा वाटा असावा. अशा प्रामाणिक भूमिकेतून विविध सामाजिक संघटना पुढे येत आहेत. जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी दररोज १७०० हून अधिक उमेदवार दूरवरून येत आहेत. पोलीस भरतीसाठी येणारे मुले-मुली हे सामन्य कुटुंबातील व ग्रामीण भागातून येत असतात, गरीब उमेदवारांना महागाईचा फटका बसू नये, जेवणासाठी धावपळ होऊ नये याकरिता विश्व हिंदू परिषदचे प्रांत उपाध्यक्ष संजय एकापुरे आणि भंडारा लोकल क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या पुढाकारातून दर दिवशी भोजनाची व्यवस्था करण्याचे नियोजन केले जात आहे, यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व औदार्य व्यक्तिमत्त्व अन्नदान करण्याकरिता पुढाकार घेतला आहे. गुरुवार दिनांक ५ जानेवारी पासून हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, त्यामध्ये भंडारा शहरातील दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थांनी तन मन धनाने या उपक्रमात सहभाग घेतला आहे. या उपक्रमात एक दिवसाचा भोजन दनाचे संकल्प
पालांदूर येथील जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष भरत खंडाईत यांनी ६ जानेवारी शुक्रवारला तर भंडारा लायन्स क्लब यांचेकडून ७ जानेवारी शनिवार ला अन्नदानाचे नियोजन पार पाडले.
हा उपक्रम मंगलवार दिनांक ११ जानेवारी पर्यंत सुरू असणार आहे. या उपक्रमाकरिता प्रत्येक व्यक्ती आपल्या योग्यतेनुसार पोलिस भरती भोजन सेवाकार्य या सेवाभावी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सहकार्य करणे सुरू केले आहे. भोजनासाठी भांडे संतोष कपूर व हनुमान मंदिर बडा बाजार भंडारा तर्फे निःशुल्क मिळाले. हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडण्याकरिता बंरी आकरे विकास भाऊ निंबारते, रवी भेंडे,गजानन मेहर, डॉक्टर वनिता शाहा, शीतल तिवारी, प्रदीप ढबाले, मयुर बिसेन, विकास मदनकर, शैलेंद्र श्रीवास्तव, नितीन कुथे, करमासिह पटेल, विकास निंबार्ते, मते, पप्पू कैथवास, यशवंत सोनकुसरे, राजकुमार भोजवानी, राकेश सेलोकर, नितीन झरकारीया, एसबीआय बँकेचे अरविंद कुमार, फुले, इत्यादींनी सहकार्य केले.