Uncategorized

राजाभोज जयंती निमित्त निमित्त , पवार समाजाच्या रुढी परंमपरेत भारतीय संस्कृतीचे दर्शन होते-माजी खासदार शिशुपाल पटले

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क:-क्षत्रिय राजाभोज पवार समाज संघटना द्वारे मौजा नकुल सुकळी (गोंडीटोला)येथे राजा भोज जयंती चे कार्यक्रम पार पडले. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार शिशुपाल पटले होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक पवार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.मुरलीधर टेंभरे यांच्या शुभहस्ते पार पडले.

ह्या दिवशी विविध कार्यक्रम घेण्यात आले. काही वेळानंतर व्यक्त्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

समाजात मोठ्या प्रमाणात आर्थिक व वेळेची हानी होत आहे. लग्न समारंभ, स्वागत समारोह यांच्या वर होणारा खर्च कमी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुरलीधरजी टेंभरे यांनी आपल्या उद्घाटन भाषनातुन केले.

माजी खासदार शिशुपालजी पटले यांनी आपल्या समाजाच्या रुढी पंरपंरा वैधानिक द्रुष्टीकोणाला अनुसरून असुन भारतीय संस्कृती चे दर्शन करुन देणारे असल्याचे आपल्या अध्यक्षीय भाषणातुन सांगितले.

ह्यावेळी मा.देवचंद ठाकरे, धनेन्द्र तुरकर, विश्वजीत पुंडे, सतीश चौधरी, उमेश तुरकर अन्य पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button