कुलदीप गंधे यांच्या वाढदिवसानिमित्त शांतीवन बुद्ध विहार चिचाळ (पात्री) येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कुलदीप गंधे यांच्या वाढदिवसानिमित्त शांतीवन बुद्धविहार चिचाळ (पात्री) येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )निमगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघाचे भंडारा तालुका अध्यक्ष कुलदीप गंधे यांच्या वाढदिवसानिमित्त शांतीवन बुद्धविहार चिचाळ (पात्री )येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला . यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी कुलदीप गंधे यांचा शाल ,पुष्पगुच्छ कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेच्या वतीने कोरोना प्रमाणपत्र व पीटी न्यूज चॅनलच्या वतीने शुभेच्छापत्र यावेळी देण्यात आले. यावेळी सनराइज कॉम्प्युटर पहेला चे संस्थापक विलास बांडेबुचे ,शांतीवन बुद्धविहारचे संस्थापक जीवनबोधी बौद्ध ,अपंग ध्रुवतारा क्रांतिकारी संघटनेचे पवनी तालुका अध्यक्ष आशिष मेश्राम, मूर्तिकार राजकुमार वाहने, जनार्दन सुखदेवे , भंतेजी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .
