क्राइम
आंधळगाव पोलीस स्टेशन मधिल प्रकरण-होमगार्डच निघाला मुख्य सुत्रधार,ग्रुहमंत्र्यांची एंन्ट्री

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता-भंडारा जिल्ह्यातील आंधळगाव पोलीस स्टेशनमधील गौतस्करी प्रकरणी मा.लोहित मतानी ,पोलीस अधीक्षक यांनी आंधळगाव चे ठानेदार मा.सुरेश मट्टामी व पोलीस हवा. सचीन नारनवरे यांनी हे प्रकरण हाताळताना कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेऊन दोघांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली.

ह्या दरम्यान माजी आमदार चरण वाघमारे यांना भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा.लोहित मतानी यांना तक्रार दिली की गौतस्कराकडुन आँनलाईन पैसे जमा करुन होमगार्डाच्या खात्यात येत होते व पोलीस अधिकारी यांनी ह्या रक्कमेतुन जमीन व प्राँपर्टी खरेदी केली असुन त्याची चौकशी ची मागणी श्री वाघमारे यांनी ग्रुहमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या कडे केली आहे.
आता ह्या प्रकरणाची चौकशी ग्रुहमंत्री यांच्या स्तरावर होत असल्याने भंडारा जिल्ह्यातील गौतस्कराचे मोठे रँकेट उघड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.




