क्राइम

मा.लोहित मतानी(पोलीस अधीक्षक भंडारा)यांच्या प्रयत्नाने तुमसर पोलीस स्टेशन अंतर्गत रेती तस्करावर कार्यवाही-परिसरात रेती तस्करांना भितीचे वातावरण

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता★प्राप्त माहिती नुसार मा. लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा यांना तुमसर तालुक्यातील तामसवाडी ते डोंगरला शिवारातील वाळु घाटातुन वाळुची अवैध तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती त्या माहिती आधारे मतानी साहेबांनी sdmआणिsdop रश्मिता राव नितिपुडी यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस विभाग व महसूल विभागाने रेती तस्करावर कार्यवाही करुन एका ट्र्याक्टर ला ताब्यात घेतले.

हे रेती तस्कर वाटसाप मँसेज द्वारे एकमेकांना माहिती पुरवत होते.SDMतुमसर आपल्या खाजगी वाहनाने रात्री पेट्रोलिंग करत असतांनी वाटसाप ग्रुपद्वारे SDMगाडीचा लोकेसन एकमेकांना देत होते.

Singam madam oR PARCAM या नावाने वाटसाप ग्रुप बनवलेला होता त्या ग्रुपच्या माद्यमातुन पोलीस वाहणाची वSDM वाहणाची लोकेसन शेअर करत होते.

ह्या ग्रुपमधील २१सदस्यावर व ग्रुप एडमिन वर सुध्दा गुन्हा नोंद करण्यात आला.

अशा प्रकारची वाटसाप ग्रुपवर रेतीतस्करांवर कारवाई ची घटना पहिल्यांदा चं होत असे निदर्शनास आले.

मा.लोहित मतानी यांनी भंडारा जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार सांभाळल्यांनंतर एकामागून एक होणाऱ्या कार्यवाही मुळे नागरिकांंत पोलीस प्रशासनाबद्दल आदराची भावना निर्माण झाली.

शासन व सामान्य जनता यांच्यामध्ये मा.लोहित मतानी(पोलीस अधीक्षक)आदर भाव निर्माण होऊन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button