क्राइम

भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत सितासावंगी गाव येथील पत्नीचा खून करुन पतीची आत्महत्या ब्लेडने चिरला गळा

राजेश ऊके(मुख्य संपादक,★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)//संजीव भांबोरे (आँल ईन्डिया प्रतिनिधी, पोलीस कि आवाज)

भंडारा- आर्थिक टंचाई आणि संशयीवृत्तीतून एकाने पत्नीचा गळा चिरुन खून केला. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. ही थरारक घटना तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे शुक्र वारी सकाळी उघडकीस आली.
सुशील बोरकर (४५) असे पतीचे तर सरिता बोरकर (३७) असे पत्नीचे नाव आहे. दोघेही सीतासावंगी येथे राहायचे. सुशीलचे अंडी विक्र ीचा व्यवसाय असून सरिता ही आशा सेविका म्हणून काम करीत होती. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी अपत्य आहेत. काही दिवसांपासून सुशील हा आर्थिक पेचात अडकला होता, अशी माहिती आहे.
गुरुवारी रात्री सुशील, सरिता व त्यांची मुले झोपी गेले. मुले एका खोलीत तर दोघेही पती-पत्नी दुसºया खोलीत होते. आज सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मुले जागी झाली. त्यांनी आई वडिलांना आवाज दिला. परंतु खोलीतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मुलांनी शेजारी राहणाºया नातेवाईकांना बोलाविले. नातेवाईकांनी येवून त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. तरीसुद्धा कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा खोलीतील दृश्य अत्यंत थरारक होते. दोघेही पती पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. सरिता बिछान्यावर तर सुशील खाली गळा चिरलेल्या अवस्थेत दिसून आला.
लागलीच गोबरवाही पोलिसांना सूचना देण्यात आली. घटनास्थळी गावकºयांनी एकच गर्दी केली होती. गोबरवाहीचे ठाणदोर दीपक पाटील यांनी ताफ्यासह धाव घेत तपासाला सुरुवात केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक लोहित मतानी व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी भेट दिली. घटनास्थळी पोलिसांना ब्लेड आढळून आली. शिवाय खोलीतील दार आतून बंद होते. त्यामुळे बाहेरुन कुणी व्यक्ती खोलीत येण्याची शक्यता नव्हती.
काही दिवसांपासून सुशिल हा आर्थिक टंचाईत होता. त्यातच तो संशय घेत होता. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पती-पत्नीतील वाद विकोपाला गेला. त्यामुळे सुशीलने ब्लेडने सरिताचा गळा चिरला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने सरिताचा मृत्यू झाला. त्यानंतर सुशीलने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने वार करुन आत्महत्या केली. सुशीलचे बोट ब्लेडने चिरलेले आढळून आले. याप्रकरणी गोबरवाही पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. अधिक तपास ठाणेदार दीपक पाटील व उपपोलीस निरीक्षक मा.करमगामी सा. करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button