क्राइम

पोलीस कि आवाज न्यू ज
नेटवर्क
भरधाव कारची दुचाकीला धडक
कोंढाळी-काटोल मार्गा वरील घटणा
अपघातात दोघे दुचाकी स्वार गंभिर जखमी
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क

दुर्गाप्रसादजी पांडे, प्रतिनिधी★पोलीस कि आवाज★
कोंढाळी-प्रतिनिधी
कोंढाळी येथील पोलीस ठाण्यां अंतर्गत काटोल-कोंढाळी मार्गावरील मेंढेपठार (जंगली) बस थांब्या समोर भरधाव कारने दुचाकीला जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन तरूण गंभिर जखमी झाले आहे. कोंढाळीकडून (एमएच 40 एआर 2543) या क्रमांकाची कार भरधाव वेगात काटोल कडे जात असतांना मेंढेपठार गांवा कडून दुचाकी येत होती. दरम्यान कारने दुचाकीला धडक दिली. यात विनोद सोनटक्के (वय 28 रा. सबकुंड), सूरज सोनटक्के (वय 30 रा. कोराडी) जखमी झाले. हे दोघेही सबकुंड येथे आपल्या नातेवाईकांकडे गेले होते. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत कारचालक गाडी सह पसार झाला. जखमींना काटोल ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर नागपूरला रेफर करण्यात आले. कोंढाळी पोलीस तपास करीत आहे.
फोटो…..भरधाव कारची दुचाकी ला धडक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button