Uncategorizedजिल्हा

किशोरी मुलीचा व मातांचा कार्यक्रम अंगणवाडी केन्द्र सोनूली

आधार संतोष निर्वान संवाददाता मोहाळी(पोलीस कि आवाज न्युज)द्वारा

दि. 26-09-2022 रोजी अंगणवाडी केंन्द्र सोनुली बीट मोहदूरा प्रकल्प भंडारा अंतर्गत व पोषण माह अभियान अंतर्गत अंगणवाडी केन्द्र सोनुली येथे किशोरी मुली व मातांचा कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बीट पर्यवेक्षिका वर्षा मेंढे यांनी आहार आरोग्य स्व्छता यावर मार्गदर्शन केले. तसेच चाईल्ड लाईन समुउपदेशक भंडारा वैशाली सतदेवे व राकेश लांजेवार यांनी बालहक्क, बाल सौरक्षण यावर मार्गदर्शन केले, महिला बाल सौरक्षण अधिकारी भंडारा, शुभांगी कोल्हे, जयश्री मेश्राम, यांनी महिला बाल अत्याचार व सौरक्षण यावर मार्गदर्शन केले.
तसेच किरण बोकडे प्रभाग समन्वयक यांनी उद्योग यावर मार्गदर्शन केले,
तलाठी प्रमिला खोडे , यानी शैक्षणिक दस्तएवज, यावर मार्गदर्शन केले.
तसेच ग्रा. पं. सोनुली सरपंच दिपाली कुरंजेकर, उपसरपंच, व ग्राम पंचायत सदस्यगण, तसेच आंगणवाडी सेविका निशा मेहर, मदतनीस प्रमिला वाघमारे, आयसीआरपी, व ग्राम संघाचे पदधिकारी किशोरी मुली व माता जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत्या..
पोलिस की आवाज
न्युज नेटवर्क
पुरुष प्रतिनिधी
आधार निर्वाण
तह. मोहाडी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button