धक्कादायक घटना शिरढोण येथे युवकावर जीवघेणा हल्ला

मा.जोतीराम कांबळे पंढरपूर संवाददाता(पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)
>पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत मौजे शिरढोण तालुका पंढरपूर येथे दिनांक .26.9. 2022 रोजी दुपारी12/30.वा. दरम्यान सुवर्णा.परमेश्वर भुसनर व त्यांचे पती परमेश्वर. भुसनर हे.दोघे राहणार शिरढोण तालुका पंढरपूर हे त्यांचे गावठाण मधील घरी स्वच्छता करण्यासाठी मोटरसायकल वरून गेले होते तेथे सागर भीमराव शिंदे राहणार शिरडून तालुका पंढरपूर हा तेथे आला त्याने सुवर्णा हिचे पती परमेश्वर भुसनर यांना मोटरसायकल लावण्याचे कारणावरून शिवीगाळ करून तुला खल्लास करतो असे म्हणून त्याचे घरात जाऊन घरातून लोखंडी तलवार आणून परमेश्वर भुसनर यांच्या डोक्यात कानाच्या पाठीमागे डाव्या बाजूस व डोक्याच्या उजव्या बाजूस व.हाताच्या बोटावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून पळून गेला. सदर घटनेबाबत फिर्यादी नामे सुवर्णा परमेश्वर भुसनर यांनी पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे फिर्याद दिल्याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे गुरुवार गु.र.नं.435/2022,भा.द.वि. कलम 307. 504. 506. प्रमाणे आरोपी नामे सागर भीमराव शिंदे राहणार शिरढोण तालुका पंढरपूर यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा तिला. आरोपी हा गुन्हा घडले पासून फरार झाला असून त्याचे शोध काम पोलीस पथक नेमण्यात आले आहे सदर गुन्ह्याचा तपास.मा. अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम सोलापूर ग्रामीण मा. अप्पर पोलीस. अधीक्षक हिंमत जाधव. सोलापूर ग्रामीण मा. उपविभागीय.पोलीस अधिकारी विक्रम कदम. पंढरपूर विभाग मां. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप शिंदे करीत आहे.




