Uncategorizedजिल्हा

भारतीय जनता पार्टी पवनी भूमी अभिलेख कार्यालयाला ताला ठोकणार

पंकज वानखेडे अड्याळ/पवनी :::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क :::::

पवनी तालुका भूमि अभिलेख कार्यालयात सतत नागरिकांना त्रासाच्या सामना करावा लागते वेगळे पैसे दिल्याशिवाय काम होत नाही तीन महिन्यापासून तालुका अधीक्षक भूमी अभिलेख जनतेला दिसलेले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यावर वचक नसून तेही गायब होतात त्यामुळे नागरिकांना खूपच त्रास होतो म्हणून भारतीय जनता पार्टी पवनी वतीने दिनांक 23 सप्टेंबरला भूमि अभिलेख कार्यालयाला टाळा ठोकणार आहेत.

  भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे, या त्रासामुळे एखादा नागरिक कर्मचाऱ्यावर हात साफ करू शकतो किंवा स्वतः आत्महत्या करू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तीन महिन्यापासून तालुका भूमी अधीक्षक जनतेला दिसलेलेच नाही. कधी येतात, कधी जातात हेच कळत नाही. अदृश्य (भूत) असल्याप्रमाणे आहेत, त्यामुळे बाकी कर्मचाऱ्यावर वचक नसल्यामुळे कर्मचारी गायब राहणे, काम बरोबर न करणे, नागरिकांना कागदपत्रे वेळेवर न देणे, अति तातडीची मोजणी चालन भरल्यावर दोन महिन्यापर्यंत चालन अपलोड होत नसल्याने तारखा उशिरा मिळणे मग अति तातडीची मोजणीचा काय उपयोग असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे. फेरफार खूप प्रलंबित आहेत पैसे घेतल्याशिवाय पास होत नाही कागदपत्राची पूर्तता झाली तरी तृट्या काढून आणखी कागदपत्र मागविणे, वर्तन उत्तर एकदम खराब आहे. त्यामुळे आज भारतीय जनता पार्टी पवनी तालुका शहराच्या वतीने तालुका दंडाधिकारी पवनी यांना निवेदन देऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळावी अन्यथा भारतीय जनता पार्टी भूमी अभिलेख कार्यालयाला 23 सप्टेंबरला ताला ठोको आंदोलन करेल आणि याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदार पवनी यांची राहील. निवेदन देते वेळी भाजपा तालुका अध्यक्ष मोहन सुरकर, भाजपा शहर अध्यक्ष मच्छिंद्र हटवार, भाजपा ओबीसी तालुका आघाडी संदीप नंदरधने, शहर महामंत्री दत्तू मुनरतीवार, सुरेश अवसरे, माजी नगरसेवक भास्कर उरकुडकर, शिक्षक आघाडीचे संयोजक प्रमोद मेश्राम सर, महेश कावळे, शिवचंद्र जांभुळे व आदित्य दळवे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button