Uncategorizedसामाजिक

ढिवर समाजातील नवयुवकांना जीवन रक्षक या पदावर शासन स्तरावर नियुक्त करा

एडवोकेट सुजाता जयघोष वालदेकर यांची मागणी

संजीव भांबोरे
भंडारा( ऑल इंडिया प्रतिनिधी )- भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षातआपण पदार्पण केले असताना देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हर्षोल्लासात साजरा करीत आहोत परंतु भारतामध्ये विविध जाती धर्मांनी नटलेल्या या भारत देशामध्ये मूलनिवासी समाज असा एक दिवस समाज सुद्धा वास्तव्यास आहे हा समाज मोठ्या संख्येने या भारत देशात राहणारा एक घटक आहे या समाजातील लोकांना रोजगारासाठी वन वन भटकावे लागते पूर्वीच्या काळी हा समाज मुरमुरे ,चणे विकून, मासेमारी करून आपलं जीवन जगत असत परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे या समाजाचं हा रोजगारही हिरावल्या गेला आहे.
नदीच्या काठावर पाण्याच्या सहवासात राहणारा हा समाज आहे अशा परिस्थितीमध्ये एक घाबरलेल्या अवस्थेमध्ये स्वतःचे जीवन घालवित असतो. ढिवर समाजातील लोक अजूनही शिक्षणापासून कोसो दूर आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, दारिद्र्याचे जीवन हा समाज जगत आहे नदीच्या काठावर वसलेला हा समाज पुरापाण्याच्या भीतीने रात्र रात्र जागून पावसाच्या दिवसात स्वतःचे व परिवाराचे जीव मुठीत घेऊन जगत असतो अशा परिवाराकडे शासनाचं अजिबात लक्ष नाही म्हणून शासनाचे लक्ष या समाजाकडे वेधून घेण्यासाठी मागील काही वर्षांपासून एडवोकेट सुजाता जयघोष वांदेकर ह्या हिवर समाजाच्या हक्क व न्यायासाठी सतत कार्यशील आहेत मग या समाजातील घरकुलाचा प्रश्न असतो, त्यांच्या रोजगाराच्या प्रश्न असो नेहमी शासनाकडे पाठपुरावा करीत असतात ढिवर समाजातील लोक पुरा पाण्यामध्ये पोहण्यात तरबेज असतात व कितीही खोल पाण्यात जाऊन एखाद्याचे प्राण वाचविण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते हे कौशल्य जाणून शासनाने प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर जीवन रक्षक आपण त्यालाच जल-रक्षक असेही म्हणू शकतो या पदावर नियुक्ती करून समाजातील नवयुवकांना रोजगार प्राप्त करून द्यावा व इतर समाजाच्या बरोबरीने आणून त्यांचे जीवन सुखमय व आनंदीदायक करावे अशी मागणी चे निवेदन एडवोकेट सुजाता जयघोष वालदेकर संस्थापक अध्यक्ष भरारी सोशल फाउंडेशन व महासचिव वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा यांनी माननीय खासदार श्री. कृपाल जी तुमाने यांच्याकडे दिलेला आहे या संदर्भात दिनांक 4/ 9/ 2022 रविवारला मुक्काम चांदोरी, जिल्हा भंडारा येथे ढिवर समाजातील लोकांना एडवोकेट सुजाता वालदेकर यांनी मार्गदर्शन केले या मार्गदर्शक मोहिमेला यशस्वी करण्यासाठी श्री. विकास जी कागदे, श्री राजू खंगार, श्री अमरदीप मेश्राम ,श्री विकास शेंडे ,श्री दिनेश कागदे, श्री शैलेश कागदे ,श्री निकेश कागदे, श्री संदीप सोनवणे, इत्यादी नवयुवक व ज्येष्ठ नागरिक यांनी सहकार्य केले या निवेदनातून शासनाने दखल घेतली नाही तर मोठ आंदोलन करण्याचं इशारा सुद्धा देण्यात येईल असे सुद्धा याप्रसंगी एडवोकेट सुजाता वालदेकर आपल्या मार्गदर्शन पण भाषणात बोलून दाखवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button