तुमसर तालुक्यातील राजापुर गावातील ताराचंद मालाधारी यांना लोखंडी सलाखीने डोक्यावर वार करून आरोपी फरार गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल



*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता*:- गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तहसील मधिल राजापुर गावातील फिर्यादी ताराचंद मालाधारी वय 75वर्षे जात-चंभार हा राजापुर गावातील रस्ताने जात असतांना आरोपी उकेश मारोती चौधरी वय40वर्षे जात-महार रा. राजापुर याने फिर्यादी च्या डोक्यावर व पायावर वार करून गंभीर जखमी केले.
सविस्तर व्रुत्त असे आरोपी आणी फिर्यादी एकाच गावातील असुन एकमेकांच्या घरासमोर राहत होते,त्यांचे एकमेकांसी पटत नव्हते.जुण्या वादावरून आरोपींने फिर्यादी ला तु जास्त माजलास मी तुला जिवाने ठार मारतो असे बोलून घरी जाऊन लोखंडी सलाख आणून रस्त्यावर गंभीर जखमी केले.
डॉक्टर परिक्षण अहवालानुसार सदचा गुन्हा अपराध क्रमांक131/2022कलम307,504,506भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी मा.संजय पाटील साहेब यांनी भेट दिली.,आणी सहाय्यक पोलीस निरीक्षक मा.दिपक पाटील सा.व पोलीस उपनिरीक्षक मा.विलास करगांमी पुढील तपास करित आहेत.





