भाजपा महिला आघाड़ीची एकच मागणी हत्यारांना फास्ट ट्रैक मधे खटला चालवुन त्वरीत अटक करा….




पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क विशेष वार्ता
मृत पल्लवी लांजेवार हिच्या हत्येच्या समस्त सासरच्या खुन्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी
या करीता भंडारा गोंदिया जिल्हाचे आमदार आम्हा सर्वांचे नेतृत्व आदरणीय श्री परिणयजी फुके साहेब यांच्या नेतृत्वात
पोलीस अधिक्षक भंडारा यांना भाजपा महिला आघाड़ी कडून निवेदन देण्यात आले...
कलम
498–A
304 –B
कलम 306 आणि 34
भांदवी या कलमानुसार गंभीर गुन्हा केलेला आहे आणि भंडारा जिल्ह्यात काळीमा फासनारी ही घटना घडलेली आहे…
ही अत्यंत गंभीर व दुर्देवी आहे त्यामुळे विशेष सरकारी वकील नेमुन जलद गतीने न्यायालयात (फास्ट ट्रैक) सदर प्रकरण चालविण्याचे तसेच मृतक पल्लवी लांजेवार हिच्या हत्येच्या मारेकरी विषयी अधिक माहिती मिळाल्यास मृतकाचे आई व तीचे नातेवाईक यांचे पुरवनी जबाब नोंदवुन अत्यंत कडक कारवाई व पोलीस तपास करून मृतक पल्लवी हिला न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन पोलीस अधिक्षक भंडारा मा.लोहित मतानी यांनी दिले..
माजी पालक मंत्री– भंडारा आणि गोंदिया जिल्हाचे आमदार आदरणीय श्री परिनयजी फुके साहेब यांनी साहेबांना आश्वस्त केले कोणतेही चालढकल न करता मृतक पल्लवीला न्याय मिळाला पाहीजे आणि त्वरीत आरोपींना अटक करा असे सांगीतले
निवेदन देतांना
माजी पालक मंत्री– भंडारा- गोंदिया जिल्हाचे आमदार आदरणीय श्री परिणयजी फुके साहेब…
*माजी नगर पालिका अध्यक्ष आदरणीय श्री प्रदीप भाऊ पडोळे…
- श्री मुन्नाभाऊ पुंडे, श्री कांशीरामजी टेंभरे, श्री बंडुभाऊ बनकर, श्री संजयभाऊ कुंभलकर, श्री पंकजजी बालपांडे,सौ गिताताई कोंडेवार,सौ कुंदाताई वैद्य, सौ मंजेरीताई पनवेलकर,सौ मालाताई बगमार ,सौ प्रियंकाताई कटरे,सौ प्रिती मलेवार
तसेच समस्त भाजपाचे कार्यकर्ता– पदाधिकारी — महिला आघाड़ी उपस्थिति होते.




