राधेय विद्यालयातील स्काऊट /गाईडच्या विद्यार्थ्यांनी वृक्षरक्षाबंधनातून दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश…

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क/चँनल
■■पोलीस कि आवाज■■
संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव /को. येथील राधेय विद्यालय पिंपळगाव /को. येथे संस्थेचे सदस्य शरद परशुरामकर यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडल्यानंतर शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, रक्षाबंधन, वृक्षरक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडला गेला..
विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन आणि वृक्षरक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करून लावलेल्या वृक्षांच्या संवर्धनाचा संदेश दिला..
शिक्षकांच्या मदतीने राधेय विद्यालयामार्फत विविध सामाजिक बांधिलकी जोपासणारे उपक्रम दरवर्षी साजरे केले जात असतात..
शाळेतील स्काऊट /गाईडच्या विद्यार्थीनीच्या हाताने वृक्षांना राख्या बांधण्यात आल्या. विद्यार्थीनींनी आपल्या भावाप्रमाणे झाडांची निगा राखण्याची ठरविले.
सदर कार्यक्रमाला संस्थेचे सदस्य शरदजी परशुरामकर, शाळेचे मुख्याध्यापक डोंगरवार सर, स. शिक्षक झोडे , कापगते सर, पि. एच. शहारे
राऊत सर, आर. एस. परशुरामकर सर, श्री. लोगडे सर, मेश्राम सर, के. एम. शहारे सर, कु. रोकडे मॅडम, कु. परशुरामकर मॅडम, शेषरावजी परशुरामकर तसेच पालक आणि गावकरी उपस्थित होते.

