Uncategorized

 पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क प्रतिनीधी
पुणेच्या धर्तीवर विदर्भात साखर संशोधन केंद्राचे स्वप्न साकार होणार..!

भारतातील प्रथम क्रमांकावर असलेला न्युज नेटवर्क//चँनल

■■पोलीस कि आवाज■■

  • डॉ. आशिषराव र. देशमुख
     काटोल-प्रतिनिधी
    •वसंतदादा शुगर इंस्टीट्युट, पुणे या साखर संशोधन केंद्राच्या शिष्टमंडळाने केली नागपूर येथे जमिनीची पाहणी.
    •प्रकल्प लवकर सुरू व्हावा म्हणून पाठपुरावा करणार.
     “पुणेच्या धर्तीवर चांगल्या प्रतीचे ऊस उत्पादन मिळून विदर्भात साखर संशोधन केंद्र सुरु करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदजी पवार आणि केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्यात चर्चा झाली. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा, यासाठी माजी आमदार डाक्टर आशिष देशमुख प्रयत्नशील आहोत. विदर्भात चांगल्या प्रतीचे ऊस उत्पादन घेऊन जास्तीत जास्त उत्पन्न व्हावे आणि येथील शेतकऱ्यांची प्रगती व्हावी, हा यामागील उद्देश आहे. त्यादृष्टीने पाहणी करण्यासाठी पुणे येथील वसंतदादा शुगर इंस्टीट्युट या प्रतिष्ठित साखर संशोधन केंद्राचे शिष्टमंडळ दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ला नागपूर येथे आले होते. साखर संशोधन केंद्राच्या उभारणीसाठी १०० एकर कृषी उपयुक्त जागेची गरज आहे. या शिष्टमंडळाने विविध जातीच्या ऊसाची लागवड करून भरीव उत्पन्न कसे घेता येईल याची पाहणी केली आणि उपयुक्त मार्गदर्शन केले. विदर्भातील शेतकरी समृध्द कसा होईल, यासाठी मी प्रयत्नशील आहे. हा प्रकल्प अभिनंदनीय असून नागपूर येथे लवकरात लवकर सुरू करण्यात यावा, यासाठी मी संबंधितांच्या संपर्कात राहून पाठपुरावा करणार आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे”, असे प्रतिपादन काटोल-नरखेड क्षेत्राचे माजी आमदार डॉ. आशिषराव र. देशमुख यांनी केले.
     डॉ. आशिषराव र. देशमुख हे १३ ऑगस्टला नागपूर येथे वसंतदादा शुगर इंस्टीट्युट, मांजरी बुद्रुक, तालुका हवेली, जिल्हा पुणे या साखर संशोधन केंद्राच्या शिष्टमंडळासोबत होते. विदर्भात आणि मुख्यत्वे नागपूर जिल्ह्यातील परिसरात पुणेच्या धर्तीवर साखर संशोधन केंद्र सुरु करण्यात यावे, यासाठी ते पाठपुरावा करणार आहेत. विविध जातीच्या ऊसाची लागवड करून साखर संशोधन केंद्र सुरु केल्यास विदर्भातील शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, अशी त्यांना आशा आहे. या कामासाठी वसंतदादा शुगर इंस्टीट्युटच्या शिष्टमंडळाने कन्हाळगाव (बुटीबोरी) येथील डॉ. आशिषराव र. देशमुख यांच्या शेतात जाऊन यासंबंधी पाहणी केली. या शेतीमध्ये सध्या २६५ जातीच्या आणि ८६०३२ जातीच्या ऊसाची लागवड केलेली आहे. या ऊस पिकाची व जमिनीची पाहणी करून या शिष्टमंडळाने उपयुक्त मार्गदर्शन केले.
       शिष्टमंडळात वसंतदादा शुगर इंस्टीट्युट, पुणेचे महासंचालक तथा माजी कृषी प्रधान सचिव महाराष्ट्र शासन. शिवाजीराव देशमुख साहेब, कृषी क्षेत्र व्यवस्थापक कटके साहेब, प्रशासकीय व्यवस्थापक . पाटील साहेब, स्थापत्य अभियंता जगताप साहेब, कृषी अभियंता शिंदे साहेब, पूर्ती साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी समय बनसोड, मुख्य व्यवस्थापक आकाश जांभूळकर, ऊस निरीक्षक , प्रदीप ठाकरे, ऊस तज्ञ , राजेश भगल (सावनेर) हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button