भंडारा जिल्हात चार दिवस मुसळधार पाउसा मुळे लोंकाचा जिव धोक्यात आहे-कलाम शेख

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चँनल ला मिळालेल्या माहितीनुसार जिल्हात चार दिवसा पासुन संततधार सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि त्यात भी कधी उष्णतेमुळे वातावरणात बदल होऊन अनेकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.रेंगेपार पांजरा आणि नदी काठावर असलेल्या ब-याच गावांना लागुन असलेले नाले हे सुद्धा तुडुंब भरून पुलावरून पाणी वाहून सर्व रहदारी मार्ग पुर्ण पणे बंद झाले आहेत! गावात थंडी लागुन ताप, सर्दी आणि खोकला हा आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असून गावात घर चे घर त्या आजारापासून त्रस्त झाले आहे, सरकारी आरोग्य यंत्रणा त्या गावापासून कोसोदूर नसली तरी आज घडीला ते तिथ पोहोचून आरोग्य सेवा देण्यासाठी असमर्थ दिसत आहे! सिहोरा गावात जरी ग्रामीण रुग्णालय असेल पण तेथे असलेले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी हे रुग्णांना योग्य उपचार आणि त्यांच्याशी चांगल व्यवहार करत नसल्याने रूग्ण त्या सरकारी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी नाईलाजाने मन मारुन जात असतात त्या रुग्णालयात कोणाची देखरेख आणि वचक नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे! आज रेंगेपार पांजरा येथिल 12 रुग्ण तिन दिवसापासून तापाने त्रस्त असून त्यांना सिहोरा येथिल खाजगी डॉक्टर कडे उपचारासाठी यायला 25 किलोमीटर लांब फिरून जीवावर उदार होऊन यावे लागले! काय गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांच्या आरोग्याकडे प्रशासनाचे लक्ष आहे? जर लगेच आम्ही याकडे लक्ष केंद्रित केले नाही तर कोरोना सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही! करीता आरोग्य विभागाने या कडे लक्ष देणे गरजेचे आहे..! असी मांगनी माजी सभापति कलम शेख पंचायत समिति तुमसर यानी केली आहे .
मा.रुपसिंगजी पिलगर
(पत्रकार *पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*)
