अड्याळ येथील गणेश सभागृहात हर घर तिरंगा अमृत महोत्सवी वर्ष अभियानाबद्दल मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न


भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल
★पोलीस कि आवाज★
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) आज दि.08.08.2022 रोज सोमवार ला ठाणेदार सुधीर बोरकुटे , API इंगोले यांनी पोलीस स्टेशन अड्याळ अंतर्गत येणाऱ्या सर्व गावातील सरपंच,पोलीस पाटील, ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष,,यांची सभा “श्री.गणेश सभागृह ” येथे आयोजित केली होती..सन 2022 हे भारतीय स्वातंत्र्याचे ” अमृत महोत्सवी वर्ष” असल्याने “घर घर तिरंगा” या अभियाना बद्दल ध्वज संहितेची माहिती,प्रत्येक नागरिकांची जबाबदारी,शांतता व सुव्यवस्था याबाबत उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले.सादर मार्गदर्शन ठाणेदार सुधीर बोरकूटे तसेच API, इंगोले यांनी केले.तसेच सायबर क्राईम भंडारा चे पोलीस अधिकारी श्री.गौतम राऊत,पोलीस हवालदार श्री. दिनेंद्र आंबेडारे,स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी श्री.अंकुर पूराम,पोलीस नायक श्री.वैभव चामट यांनी,cyber Bank Frod,On line bank frod, Social media frod,,Wattup, Facebook,Instagram यातून होणारी फसवणूक,अमली पदार्थांचे सेवन केल्यास होणारे दुष्परिणाम,, याबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले…याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी सर्व उपस्थितांना दिल्या… यावेळी सरपंच जयश्री कुंभलकर ,तंटामुक्त समिती अध्यक्ष मुनिश्वर बोदलकर, ,ग्रामपंचायत सदस्य जागेसर मडावी ,ग्रामपंचायत वरिष्ठ लिपिक रामा न्यायमूर्ती ,ग्रामपंचायत कर्मचारी गणेश लांजेवार, संगणक ऑपरेटर पवन वंजारी, कावळे ,गायधने ,तसेच ग्रामस्थ उपस्थित होते .