Uncategorized

भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत चर्च रोड मेंढाभंडारा मध्ये एका युवकाचा खुन

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता★-प्राप्त माहितीनुसार भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत 04/08/2022रोजी दाखल झालेल्या खुनाच्या गुन्हातील आरोपी1) क्रुष्णा रामदास चापरे वय(25),2)राकेश महादेव नंदुरकर वय(25)वर्षे नेहरू वार्ड मेंढा येथील रहिवासी असुन यांना अटक करण्यात आली.

सविस्थर व्रुत्त असे की4/8/022 ला दुपारी 12.30 वाजे दरम्यान चर्च रोड मेंढा येथे म्रुतक नामेंंओमप्रकाश धनराज मेश्राम वय(31)पांढराबोळी येथील रहिवासी असुन यांना धारदार शस्त्राने मारुन जखमी केले. सदर घटनेबाबत माहिती भंडारा पोलीस स्टेशनला फोनवर मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निखील रहाटे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे,पोलीस हवा.बाला वरकडे, पो.नायक विजय चोले, पोलीस सी.नरेंद्र झलके, पो.शि. हिरालाल लांडगे हे सर्व घटनास्थळी जाऊन जखमी ला उपचारासाठी सामान्य रुग्नालयात भंडारा ईथे नेलेअसता उपचारादरम्यान ओमप्रकाश मेश्राम म्रुत झाले असे डॉक्टरांनी घोषित केले. सदर गुन्हातील फरार आरोपी अटक कार्यवाही मा.अनिकेत भारती प्रभारी पोलीस अधीक्षक भंडारा, मा.संजय पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली *पोलीस निरीक्षक सुभाष बारसे*,गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल रहाटे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, बाल्या वरकडे पो.हवा. ,विजय चोले पो.ना.,नरेंद्र झलके पो.शि.हिरालाल कांबळेपो.शि.,यांनी आरोपी पळून जात असतांनी सापळा रचुन चक्कर रोडवर यशस्वी रित्या पकडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button