Uncategorized

हिंगणा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

भारत का नंबर वन न्युज नेटवर्क//चँनल

★पोलीस कि आवाज★

संजीव भांबोरे
हिंगणा: (ऑल इंडिया प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था, डॉ. बाबासाहेब आम्बेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, समतादूत प्रकल्प नागपुर विभाग तालुका हिंगणा व साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बहुउद्देश्यीय संस्था रायपुर (हिंगणा), संघर्ष बहुउद्देश्यीय संस्था इसासनी यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक रायपुर (हिंगणा) येथे अभिवादन तथा प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सर्व प्रथम साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारक पूर्णाकृती पुतळयाला हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर, सामाजिक कार्यकर्ते केशवजी डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते श्रावण गोसावी, ग्रामसेवक धैर्यधर शेंडे, माजी सैनिक अम्बादास काळे, दीपक गायकवाड़, धीरज वानखेडे, विजय पाटिल, दिलीप गायकवाड़ यांच्या संयुक्तहस्ते माल्यार्पण करून मानवंदना देण्यात आली. तसेच भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन करण्यात आले.
या प्रसंगी समतादूत सतीश सोमकुंवर यांनी अण्णाभाऊ साठे यांचे विविध क्षेत्रातिल योगदान या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच सामाजिक न्याय विभाग आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ मार्फत राबविन्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थित समाज बांधवांना दिली. तसेच सामाजिक कार्यकर्ते केशवजी डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते श्रावण गोसावी, ग्रामसेवक दर्याधर शेंडे, माजी सैनिक अम्बादास काळे, तनुताई झिल्पे यांनी साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्यवर प्रबोधन करून जयंतीच्या शुभेच्छा प्रदान केल्या.
कार्यक्रमाला श्रावण गोसावी, केशव डोंगरे, अम्बादास काळे, शेखर गायकवाड, दिलीप गायकवाड़, रवि बावने, रेखाताई गायकवाड़, प्रियाताई बावने, दिवाकर मेश्राम, दीपक गायकवाड़, कैलास वानखेडे, मंगेश काळे, मंगेश डोंगरे, गोलू गायकवाड़, आकाश काळे, विजय गायकवाड़, महेंद्र काळे, घनश्याम गायकवाड़, प्रभाकर वानखेड़े, सूरज गायकवाड़, विजय पाटिल, धीरज वानखेड़े, गोपाल भिवापुरे, राजू तेलंगे, दन्यानेश्वर डोंगरे आदी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत सतीश सोमकुंवर यांनी केले. आभार दिलीप गायकवाड़ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button