Uncategorized

सिल्लोड शहर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सज्ज ; आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने जैय्यत तयारी

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क/चँनल *पोलीस कि आवाज न्युज * चे पत्रकार शेख चांद भाई यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची असणार विशेष उपस्थिती

माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व प्रा. सुरेश नवले यांचा सामर्थकांसह होणार प्रवेश

*सिल्लोड* ( प्रतिनिधी ) दि. 29, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सिल्लोड येथील नागरी सत्काराची आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने जैय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सिल्लोड शहरात एकच वातावरण निर्मिती करण्यात आली असून मतदारसंघ स्वागतासाठी सज्ज झाले आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रविवार रोजी विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पण निमित्ताने सिल्लोड येथे येत आहे. यानिमित्ताने ओबीसींना आरक्षण मिळवून देण्याकामी मोलाचे योगदान दिल्याबद्दल समस्त ओबीसी समाज व लोकनेते आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याची आयोजकांच्या वतीने जैय्यत तयारी करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सिल्लोड शहरांतील प्रत्येक चौकात स्वागताचे बॅनर, होर्डिंग, कामानी, भगव्या पताका लावल्याने शहरात नागरी सत्काराचे एकच वातावरण निर्माण झाले आहे.

नगर परिषद प्रशालेच्या प्रांगणात मुख्यमंत्र्यांची होणार सभा

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क/चँनल
पोलीस कि आवाज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दुपारी 12 वाजता सिल्लोड शहरात आगमन होणार आहे. शहरातील औरंगाबाद नाका ते सभास्थळापर्यंत मुख्यमंत्र्यांचे पुष्पवृष्टीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यादरम्यान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण व प्रवेशद्वाराचे लोकार्पण, शहरातील स्व. बाळासाहेब ठाकरे चौकाचे लोकार्पण, तालुक्यातील 665 कोटी रुपयांच्या वॉटरग्रीड योजनेचे भूमिपूजन, नॅशनल सुतगीरणी उभारणी कामाचे भूमिपूजन,सिल्लोड नगर परिषद प्रशासकीय इमारत तसेच नगर परिषद प्रशाला बांधकामांचे भूमिपूजन , नॅशनल मेडिकल कॉलेज चे भूमिपूजन आदी विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. त्यानंतर नगर परिषद प्रशाला येथे आयोजित भव्य सभेला मुख्यमंत्री संबोधित करतील.

     याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमात माजी मंत्री अर्जुनराव खोतकर व  प्रा.सुरेश नवले उपस्थित राहणार असून ते यावेळी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देऊन प्रवेश करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button