Uncategorized

गोबरवाही पोलीसांनी मिळवून दिले हरवलेले दहा मोबाईल

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चँनल

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला गोबरवाही पोलीस स्टेशन मा.ठानेदार दिपक पाटील साहेब यांच्यामार्फत मिळालेल्या माहिती नुसार,मिळालेल्या मोबाईल फोन बद्द्ल माहिती
सादर,
आधुनिक युगात मोबाईल फोन म्हणजे प्रत्येक व्यक्ती साठी अविभाज्य भाग बनला आहे.सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत बरेचजण मोबाईल फोन हाताळत असतात.एका क्लीकवर जगाशी जोडणारा हा मोबाईल फोन प्रत्येकाचा अगदी जिवाभावाचा साथीदार,पण समजा हा मोबाईल फोनच हरवला तर…हो बऱ्याच वेळा अनेकांचा मोबाईल फोन हरवतो. अशा वेळी मोबाईल मध्ये असणारे संपर्क नंबर,फोटोज,व्हिडीओ हे तर गमावले जातेच त्याचबरोबर आर्थिक भुर्दंड बसतो तो वेगळाच.
अशा वेळी अनेकजण पोलीसात तक्रार करतात.
असेच गेल्या 2 वर्षात गोबरवाही पोलीस स्टेशन हद्दीतील अनेकांचे मोबाईल फोन हरवले.त्यातील अनेकांनी गोबरवाही पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.पो स्टे गोबरवाही चे ठाणेदार दीपक पाटील यांनी पोलीस ठाण्यातील पोउप निरीक्षक विलास करंगामी , मनोज साकुरे,संतोष कुकडे,रवि जायभाये यांचे पथक मोबाईल शोधण्यासाठी नेमले.पथकाने सायबर पोलीस स्टेशन भंडारा यांच्या मदतीने हरविलेल्या मोबाईल फोन पैकी तब्बल 10 मोबाईल फोन शोधून काढले.फोन च्या मूळ मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून ठाणेदार दीपक पाटील यांनी सन्मानपूर्वक मोबाईल फोन परत केले.यावेळी अनेकांनी मोबाईल फोन मिळण्याची आशा सोडून दिली होती असे मत व्यक्त केले.मूळ मालकांना हा जिवाभावाचा साथीदार पुन्हा गवसल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.पोलीसात केवळ तक्रार लिहिली जाते, त्या तक्रारीचे पुढे काहीच होत नाही हा गैरसमज गोबरवाही पोलिसांच्या या कामगिरीने दूर झाला.

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क* व सर्व टीम ने ठानेदार मा.दिपक पाटील साहेब व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button