गोबरवाही येथील अनुसूचित जातीच्या महिलावर वनविभागाच्या माद्यमातुन कार्यवाही




*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क क्राईम वार्ता*-नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील गोबरवाही गावातील एका निराश्रित महिला प्रियंका लोखंडे ने गोबरवाही-पवनारखारी रस्त्यावर नहराच्या कडेला एक झोपडी बनवून आपल्या चिमुकल्या मुलीसोबत राहत होती. परंतु वनविभागाची जागा असल्याने वनकर्मचाऱ्यांनी त्या महिलेची झोपडी तोडली. त्या बाजुला वनविभागाच्या जागेत जुने अतीक्रमन आहेत,मग ह्या निराश्रित महिला वर अत्याचार का? प्रियंका चा पती काही दिवसापूर्वी च म्रुतुमुखी झाला.
त्या विरोधात राकापा नेता दिलीप सोनवाने व सुरेश रहांगडाले यांनी अन्याय पिडीत महिला व अन्य कार्यकर्ते सोबत गोबरवाही पोलीस स्टेशन चे ठानेदार मा.दिपक पाटील यांना निवेदन दिले.
निवेदन देतांना सर्वश्री व्रुषब मेश्राम, अनमोल मेश्राम, अजय तिरपुडे, शिवम खोब्रागडे, सत्यशील मेश्राम, दुर्गेश मेश्राम,विरेंद्र उके, संदीप उमरकर,प्राशिक गजभिये, फुलेश्वर वर्मा, पुष्पक गजभिये, महेद्र लांजेवार, आशिक धुर्वे, राकेश कुर्वे,राजा मेश्राम, रोशन भोरगडे,दुर्गा परतेती, रामचंद्र मोरे, लतीफ शेख आदी उपस्थित होते.


