Uncategorized

शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे प्रियदर्शी सम्राट अशोक मूर्ती तयार करण्यासंबंधी चर्चा संपन्न

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
संजीव भांबोरे(राष्ट्रीय अध्यक्ष, पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क)
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) भंडारा जिल्हा पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे आज दिनांक 26 जुलै 2022 रोज मंगळवार ला दुपारी 1 वाजता महाबोधी उपासक संघ शांतीवन बुद्ध विहाराचे सचिव जीवन बोधि बौद्ध यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी भदंत विनय बोधी, माहाथेरो, श्रवण बुद्धपाल, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, पत्रकार जयेंद्र चव्हाण, समाधान तिरपुडे, विपिन टेंभुर्णे ,गुलाब घोडके ,विवेक सुखदेवे ,जनार्दन सुखदेवे ,आशिष मेश्राम यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाकारूणी तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे पूजन करून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली .यामध्ये सामूहिक चर्चा होऊन प्रियदर्शी सम्राट अशोक यांची मूर्ती तयार करण्याचे ठरविण्यात आले व त्या मूर्तीचे अनावरण संविधान दिनी 26 नोव्हेंबर 2022 ला करण्याचे ठरविण्यात आले. अशाप्रकारे कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button