शेतकऱ्यांनो! विमा काढा अन् नुकसान टाळा
नोंदणीसाठी ३१ जुलै शेवटची तारीख


पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
गोंदिया – सध्याच्या पावसाची आणि हवामानाचा अंदाज पाहता शेतकऱ्यांनी त्वरीत पीक विमा काढून भविष्यात होणारे नुकसान टाळा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यंदा चालू खरीप हंगामात गोंदिया जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना एचडीएफसी एर्गो इन्शुरन्स कंपनीकडून राबविण्यात येत आहे. बीड पॅटर्ननुसार पीक विमा राबविण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहे.
गोंदिया जिल्ह्याकरिता धान पीक अधिसूचित आहे. धानासाठी प्रति एकरी ३५०रुपये शेतकरी हिस्सा आहे. त्याची विमा संरक्षित रक्कम १७५०० एवढी आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकरी यांना ऐच्छिक असून सहभागी होण्याची ३१जुलै ही अंतिम तारीख आहे. त्यामुळे त्वरीत पीक विमा काढावा, असे आवाहन तिरोडा चे कृषी सेवक श्री जितेंद्र बावनकुळे यांनी केले आहे. बिहिरीया येथील शेतीशाळेत ते बोलत होते.
पीक नुकसानी बाबतची पूर्व सूचना शासनाने विकसित केलेल्या क्रॉप इन्शुरन्स ॲप व एचडीएफसी इरगो विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८००२६६०७०० विमा कंपनीचे जिल्हा व तालुकास्तरीय कार्यालय, विमा कंपनीच्या ईमेल, संबंधित बँक किंवा कृषी विभाग याद्वारे देण्यात यावी. कर्जदार/ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत विमा संरक्षण मिळण्यासाठी ३१ जुलै पूर्वी नजीकच्या बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन हप्त्यासह व आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव सादर करावा, असे तालुका कृषी अधिकारी श्री. डी एल तुमडाम यांनी कळविले आहे.