Uncategorized

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★ महाराष्ट्र बैंक कर्मचाऱ्यांच्या वागणुकीमुळे ग्राहकांस मनस्ताप

*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*

बँक मैनेजर व कॅशियर वर कार्यवाहिची ग्राहकाने केली मागणी

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) तुमसर येथील स्थानिक महाराष्ट्र बैंकेच्या व्यवस्थापक व बाबु घ्या चुकिमुळे बैंक खातेदार प्रफुल भरत मेश्राम याला मानसिक मनस्ताप सहन करावा लागला असुन जमा केलेला चेक आठ दिवसानंतर बैंक कर्मचार्यांनी परत केल्याने खातेदाराला मोठा त्रास सहन करावा लागला.
प्रफुल्ल भरत मेश्राम/उषा प्रफुल्ल मेश्राम यांचा बैंक ऑफ महाराष्ट्र तुमसर मधे सन 2013 पासुन सेविंग खाता क्रमांक 601 4588 9268 आहे .यांनी 12/9/ 2022 ला स्टेट बैंक चा एक चेक क्रमांक
081 335 जो सहयोग सहकारी पत संस्था ने दिला तो चेक महाराष्ट्र बैंके तुमसर शाखेत १२ तारखेला जमा केला .परंतु त्या चेकचे पैसे आठ दिवसांनंतर म्हणजे , १९ तारखेला खात्यात पैसे जमा झाले का असे विचारायला बैंकेत गेले असता प्रफुल मेश्राम यांना महाराष्ट्र बैंकेच्या कर्मचार्यांनी चेक परत केला व म्हणाले कि
३०००० रुपयांचे चे दोन चेक बनवून आना तेव्हा चेक जमा होईल असे सांगितले .चेक जमा करतांना हि बाब सांगण्यात आली नाही.व आठ दिवस चेक बैंकेत ठेऊन आठ दिवसानंतर खातेदाराला खोटे कारण सांगुन चेक वापस करने खातेदाराला समजण्यापलिकडे झाले.त्या खातेदाराला मुलीच्या अडमिशन करिता पैशाची अंत्यंत आवश्यकता असल्याने आपण आता कसे करावे हे समजेनासे झाले.सदर इसमाने जिथे काम करतो त्यांना झालेला प्रकार सांगीतला व बैंकेत व्यापारी असोसिएशन चे सचिव दिनेश नागापोता ,नगरसेवक शाम धुर्वे यांना सोबत घेऊन विचारणा करण्याकरिता गेले असता बैंक मेनेजर व कर्मचारी उडवाउडवीचे उत्तर देताना दिसले. व अनेक कारणं सांगु लागले .
गरीब मानसाला आपल्या मुलीच्या एडमिशन साठी पैशाची गरज होती, वेळीच पैसे बैकेकडून न दिल्याने मोठे नुकसान होऊ शकतं होते.
चेक जमा करन्याची कोणतेही अट नसते तरी सुध्दा एक जिम्मेदार बैंक द्वारा अशा प्रकारे अडवणुक करुन मानसिक त्रास देने बरोबर नसुन अशा बैंक अधिकार्यांवर कार्यवाही करण्याची मागणी ग्राहक व व्यापारी दिनेश नागापोता ,व नगरसेवक शाम धुर्वे यांनी केली आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button