Uncategorized

पं.स. सभापती नंदुभाऊ रहांगडाले आणी उपसभापती हिरालाल नागपुरे यांची गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट.. आरोग्य उपकेंद्राच्या समस्या जाणून घेतल्या.. आरोग्य विभागाला त्वरीत उपाययोजना करण्याचे दिले निर्देश…

आज प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गोबरवाही येथे पंचायत समिती सभापती श्री नंदूभाऊ रहांगडाले व पंचायत समिती उपसभापती श्री हिरालालजी नागपुरे, चिखला जिल्हा परिषद सदस्य श्री कृष्णकांत बघेल, गोबरवाही पंचायत समिती सदस्य श्री नरेंद्र गेडाम, तुमसर पंचायत समिती टीएचओ श्री कुरेशी साहेब, गोबरवाही पी.एच.सी डॉक्टर अंकिता मयूर व गावकरी यांनी गोबरवाही पी एच सी ला भेट दिली व तिथल्या समस्या जाणून घेतल्या. व समस्येवर आरोग्य विभागाला त्वरीत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.. त्याचबरोबर स्वच्छतेवर विशेष भर दिला. परिसरातील समस्त नागरिकांना वेळेवर औषधोपचार पुरवावे अशा सुचना ही दिल्या. पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्य विविध समस्या निर्माण होतात त्यामुळे संबंधित समस्येवर त्वरीत उपाययोजना कराव्यात अशा सुचना ही आरोग्य विभागाला दिल्या. संपूर्ण तालुक्यात आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावे अशा सुचना ही दिल्या..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button