अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे उदात्तीकरण

राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश भाऊ पारधी यांचा आरोप: मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
*पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क*
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.ए.
अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी
महाराज व रामदास यांचे गुरू-शिष्य
संबंध जोडून मनुस्मृतीच्या उदात्तीकरण
केले आहे. हे अभ्यासक्रमातून तत्काळ
हटवावे, अशी मागणी राष्ट्रीय उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी बहुजन महासंघ गणेश भाऊ पारधी यांनी
केली आहे. नाशिक येथील यशवंतराव
चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे
कुलगुरू यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, यशवंत
चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या बी.ए.
तृतीय वर्ष राज्यशास्त्राच्या १२ जुलै
२०२२ च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्र.2
(अ) मध्ये शिवाजी महाराजांच्या
राजनीतिला समर्थ रामदासांनी केलेले
योगदान सांगा तसेच प्रश्न क्र. ३ (ई)
मध्ये मनुस्मृती या ग्रंथाचे सामाजिक
महत्त्व स्पष्ट करा. हे प्रश्न विचारण्यात
आले आहेत.
मुक्त विद्यापीठात भारतीय संविधान
अभ्यासक्रमाचा समावेश
करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी
महाराज व रामदास स्वामी यांची भेटच
झाली नसल्याचे अनेक इतिहास
संशोधकांनी व दि.१६ जुलै २०१८
रोजीच्या औरंगाबाद खंडपीठाने
निकालात नमूद केले आहे. असे
असताना हा खोटा इतिहास लिहिणारी
अभ्यासक्रम समिती रद्द करावी.
प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या प्रश्नांबाबत
यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठाने
जाहीर माफी मागावी, अशी मागणी
करण्यात आली आहे.