अतिवृष्टी मुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीची पाहणी करून पंचनामे करा व नुकसान भरपाई द्या:-माजी खासदार शिशुपाल पटले

बपेरा गावात दौरा करून केली पाहणी

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
राजेश ऊके पत्रकार द्वारा
भंडारा जिल्यात मागील ७ दिवसापासून होत असलेल्या सततच्या पावसामुळे शेतीला तलावाचे रूप आले आहे. त्यामुळे शेतीत लावलेले धानाचे रोपे व रोवणे कोठे वाहून गेले तर कोठे ७ दिवसापासून पाणी साचून असल्याने कुंजले आहेत. अतिवृष्टीमुळे मातीची घरे व गोठे पडून अनेक गरीब बेघर होऊन त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान ग्रासतांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी किसान मोर्च्याचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा.शिशुपाल पटले यांनी केली आहे. आज त्यांनी बपेरा क्षेत्रातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला.नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या व बेघर झालेल्या नागरिकांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या.आजच्या दौऱ्यात किसान मोर्च्याचे जिल्हा अध्यक्ष डॉ. हरेन्द्र रहांगडाले, जिल्हा उपाध्यक्ष मुन्ना पुंडे,तालुका अध्यक्ष कांशीराम तेंभरे,तालुका महासचिव व बपेरा जिल्हा परिषद क्षेत्र प्रमुख किशोर रहांगडाले,तालुका उपाध्यक्ष देवानंद लांजे,गोवर्धन शेंडे,चेतन रहंगडाले सरपंच विनोद पटले,संदीप जटाले,डॉ मुरलीधर बानेवार,हिरालाल उपरिकार,उपसरपंच सोहन पारधी,सुनील शिवणे,मोनिस राऊत,लहान नेता संतोष गौतम,संजय राऊत, निलेश गोंडाणे,आकाश गोंडाणे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.