Uncategorized

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या :- मोहन पंचभाई

पंकज वानखेडे अड्याळ/पवनी ::::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क ::::

👇 अध्यक्ष भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी मोहन पंचभाईंचे जिल्हाधिकारींना निवेदन

मागील पाच ते सहा दिवसापासून जिल्ह्यात अतिवृष्टी सुरू असून गावातील नाले ओसंडून वाहत असल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीची प्रचंड नुकसान झाली असल्याने शासनाकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली.
चालू सप्ताहात मेघगर्जनेसह पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक ठिकाणी वीज पडल्याने जिल्ह्यात जवळपास दहा जीवांचा बळी गेल्याची माहिती आहे. या थरारासह नदीला आलेल्या पुराने भयावह स्थिती निर्माण केली आहे. तुडुंब भरलेल्या नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. पावसाळी पिके घेण्यासाठी पेरणी करण्याची वेळ असताना काहींची रोवणी झाली असली तरी अनेक शेतकरी पुरामुळे वंचित होत आहेत. झालेली रोवणी शेतशिवार पाण्याने टंच भरल्याने नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मशागत करून देखील अनेकांची पूरस्थितीमुळे रोवणी खोळंबली आहे . जिकडे पहावे तिकडे पाणीच पाणी अशी स्थिती निर्माण झाल्याने पीक घेण्यापासून वंचित रहावे लागणार असून शासनाने तात्काळ मदत सरसकट द्यावी तसेच दमदार पावसाने रस्ते ठीकठिकाणी उघडले असून ये-जा करताना डबक्यात साचलेल्या पाण्यामुळे प्रवाशांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. अनेक प्रवासी दुचाकी ने प्रवास करताना पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. निलज-कारधा महामार्गाचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला गावात व शेतात जाणारे पोचमार्ग बनविला गेले नाही. परिणामी पाण्याच्या प्रवाह जिथल्या तिथेच थांबून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन क्षतीग्रस्त रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांनी निवेदनातून केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button