लोन्हारा येथे शालेय विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण
पंकज वानखेडे अड्याळ/ पवनी :::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क ::::
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील लोन्हारा येथे शालेय विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
सर्वत्र शाळा सुरू झालेल्या आहेत. अनेक गरीब कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्या मुलांना शिक्षणात अनेक अडथळे निर्माण होतात परिणामी ते शिक्षण पूर्ण करू शकत नाही परंतु त्यांनी जिद्द व चिकाटीने परिस्थितीवर मात करून उच्च शिक्षण घेऊन नावलौकिक केले पाहिजे असे प्रतिपादन सरपंच सतीश घरडे यांनी केले. याप्रसंगी शाळेचे विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. दिनांक १३ जुलै २०२२ रोज बुधवारला ग्रामपंचायत कार्यालय लोणारा येथे इय्यता १२ वी व १० वी मध्ये प्रथम, द्वितीय, व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मनोहरजी बावनकर गुरुजी पवनी यांचे कडून देण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित सरपंच सतीस कबाजी घरडे तसेच उपसरपंच श्रिकिषण कुंभरेजी तसेच ग्रामपंचायत सदस्य व इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.

