Uncategorized

“पवनी तालूक्यात पूरस्थितीमुळे जनजिवन विस्कळीत ….._

नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करून त्वरित मदत करावी :- यादव मेंगरे जिल्हा अध्यक्ष , सरपंच सेवा महासंघ , महाराष्ट्र

पंकज वानखेडे अड्याळ/पवनी :::
पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क ::::

गेल्या चार पाच दिवसां पासून सुरू असलेल्या सततधार पावसामुळे पवनी तालुक्यात सर्वञ पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.परीणामी जनजिवन विस्कळीत झाल्याचे चिञ दिसून येत आहे. सततधार पावसामूळे जून्या पडक्या घरांची पतझड झाली असून अती पावसामूळे गोसेखुर्द प्रकल्पाचे 33 दरवाजे खुले केल्याने नदी नाल्याची पातळी वाढल्याने अती पावसाने पूरस्थीती निर्माण झाली. या पुरामूळे शेतकर्यांच्या शेतातील भाजीपाला व धानपीकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. काही शेतकरी शेतात धान रोवणी सुध्दा केली होती.माञ अती पावसामुळे रोवणी कुजली व सदर धान पीक नदी नाल्या जवळील भागातील पिक पुराच्या पाण्याखाली सापडल्याने खराब झाल्याने दुबार पेरणीचे संकट अथवा शेती पडीत ठेवण्याची वेळ शेतकर्यावर आलेली आहे. पावसामूळे वाहतूक सुध्दा खोळंबली असल्याने शाळकरी मुलांची शाळासुध्दा भरत नसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. शेतकर्याची होत असलेली नुकशान लक्षात घेता दुबार पेरणी साठी मोफत बियाणे व आर्थीक मदत देण्याची मागणी यादव मेंगरे सरपंच बाम्हनी तथा जिल्हा अध्यक्ष सरपंच सेवा महासंघ तसेच नुकसानग्रस्त शेतकर्यानी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button