Uncategorized

भारतातील नंबर वन न्युज नेटवर्क ■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■ प्रती पंढरपूर नंदवाळ येथे चंदूकाका ज्वेलर्सकडून भाविकांना उपवासाचे लाडू व पाणी वाटप

वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात विठ्ठलाची सेवा: डॉ.कृष्णदेव गिरी

★पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क★

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) – प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे करवीर तालुक्यातील नंदवाळ या गावी प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला लाखो भाविकांची गर्दी विठ्ठलाच्या दर्शनासाठी होते. यावर्षी चंदूकाका सराफ परिवाराकडून भाविकांना उपवासाच्या लाडू व शुद्ध पाण्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन हजारे पेट्रोल पंपाचे मालक अमित हजारे व योगेश हजारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. कृष्णदेव गिरी, डॉ. सुरेश राठोड व डॉ. सुशील अग्रवाल होते. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महाराष्ट्र मध्ये पंढरपूर हे विठ्ठलाचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. प्रत्येक वर्षी आषाढी एकादशीला वारकऱ्यांना म्हणजेच विठ्ठलाच्या भक्तांना साक्षात विठ्ठल दिसतो असे विठ्ठल भक्तांचे म्हणणे आहे. त्याचप्रमाणे वर्षातून एकदा म्हणजेच आषाढी एकादशीला साक्षात विठ्ठल हे काही वेळासाठी कोल्हापूर मधील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे नंदवाळ या गावी येतात असा पौराणिक कथेमध्ये उल्लेख आहे. म्हणून अशा या एकादशीला विठ्ठलाला भेटण्यासाठी लाखो भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
मोठ्या प्रमाणात उपस्थित वारकरी भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक विठ्ठल भक्त आपापल्या पद्धतीने दानधर्माचा प्रयत्न करीत वारकऱ्यांना फराळ वाटपाचा कार्यक्रम राबवतात, असाच एक उपक्रम चंदूकाका ज्वेलर्स परिवाराकडून नंदवाळच्या पायथ्याशी हजारे पेट्रोल पंप वाशी येथे उपवासाचे लाडू व शुद्ध पाणी वाटपाचा कार्यक्रम करून विठ्ठल भक्त वारकऱ्यांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ.कृष्णदेव गिरी म्हणाले, चंदूकाकाकडून आज या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा विचार करून उपवासाचे लाडू व पाणी वाटपाचा कार्यक्रम माझ्या हस्ते करत असताना मला प्रत्यक्षात विठ्ठलाची सेवा केल्याचा आनंद होत आहे.
यानंतर डॉ.सुरेश राठोड म्हणाले, प्रत्येक वेळी, वेगवेगळ्या उपक्रमाने चंदूकाका सराफ हे चर्चेत असतेच पण हे एकमेव ज्वेलर असे आहे की, यांना फक्त पैसा मिळवायचा नाही तर समाजाप्रती प्रेम जिव्हाळा व आपुलकी मिळवून समाजाला चोक व शुद्ध द्यायचे आहे.
या भक्तीपूरक कार्यक्रमाला चंदुकाका ज्वेलर्सचे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह राहुल चांदणे, योद्धा चे कमांडो सर्जेराव कांबळे व सर्व कर्मचारी यांचे सहकार्य होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button