Uncategorized

संजय गांधी निराधार व इतर योजनांचे नियमित पैसे द्या:- वंचित बहुजन आघाडी

■पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क■

संजीव भांबोरे
भंडारा( जिल्हा प्रतिनिधी) संजय गांधी निराधार योजना ,अपंग, योजना श्रावण बाळ व योजना, राष्ट्रीय विधवा योजना ,राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, संजय गांधी निराधार या योजनेचे दर महिन्याचे मानधन 1000 रुपयाच्या जवळपास मिळते परंतु गेल्या सहा महिन्यापासून हे मानधन थकीत झालेले आहे सरकारचा आधार म्हणून जगत आहेत त्यांची सध्या उपासमारीची वेळ आलेली आहे खूप महागाई वाढलेली आहे या महागाई मध्ये हा आधार कमी आणि तोडगा पडत आहे असे असताना सुद्धा खर्च वाढलेला आहे प्रत्येक निराधार लोक बँकेमध्ये चकरा मारत आहेत त्यांना खूप दर महिन्याला त्रास होत आहे आणि त्यामुळे यांचे पैसे ताबडतोब देण्यात यावे याकरिता तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आलेला आहे याप्रसंगी वंचित बहुजन यादवराव गणवीर, साकोली तालुका निरीक्षक ऍड सुजाता वालदेकर, तालुका महिला आघाडीचे अध्यक्ष तनुजा नागदेवे ,तालुका सचिव पुष्पा बडोले, प्राध्यापक रोशन भोवते ,सविता जनबंधू, गीता खंडारे ,संध्या बोरकर, कुंदा भोवते, गणेश गजभिये, प्रशिक मोटघरे , जगदीश रंगारी आंब्रपाली मोटघरे,अमित वैद्य, तबसूम खान,इतर कार्यकर्त्यांच्या निवेदनावर सह्या आहेत यांची मागणी आहे की शक्यतो लवकर सरकारचा आधार असलेले निराधार लोकांना लवकरात लवकर त्यांच्या मानधन देण्यात ती विनंती प्रशासनाला साकोली तालुका बहुजन वंचित बहुजन आघाडी यांनी केलेली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button