Uncategorized

भंडारा जिल्ह्यात बोगस लॅबचा सुळसुळाट
आरोग्याच प्रश्न ऐरणीवर

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क
भंडारा-
वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदवी पदविका प्राप्त व महाराष्ट्र पॅरावैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नसलेल्या अनधिकृत बोगस पॅथॉलॉजी लॅबची कारवाई करून त्या लॅब बंद करण्यात याव्यात अशा प्रकारे जिल्ह्यातील जनतेची मागणी होत आहे .महाराष्ट्र शासनाने राज्यांमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना अनधिकृत करण्यासाठी महाराष्ट्र पॅरावैद्यकीय परिषदेची स्थापना जुलै २०१७ मध्ये करून तसा कायदा राज्यपाल महोदयाची स्वाक्षरीने संमत करून तो लागू केलेला आहे . तरीपण राज्यात अनेक अप्रशिक्षित दहावी बारावी पास नापास मुलं मुली कुठलं तरी बोगस डिप्लोमा घेऊन शहरात आणी खेडोपाडी स्वतंत्रपणे बिनधास्तपणे पॅथॉलॉजी लॅब चालवून रुग्णांची अतोनात लुटमार करीत आहे. त्यांच्याकडे कुठलाही वैद्यकीय डिप्लोमा नसून नोंदणी पत्रक नाहीत असेही मुलं-मुली बोगस लॅब चालविणारे संपूर्ण जिल्ह्यात शेकडोच्या वर संख्याअसण्याची दाट शक्यता आहे.
परंतु आजपर्यंत भंडारा जिल्हाधिकारी आरोग्य विभाग यांच्याकडे अधिकृत अनधिकृत फोग असल्याची संख्या शासकीय दरबारी नोंद नाही ज्या शहरातील याची नगरपालिका महानगरपालिका खेड्यापर्यंत ग्रामपंचायतकडे नोंद असणे आवश्यक आहे ती कुणाकडेही नाही कुणीही बोगस लॅब चालकयेतात आणि स्वमरजीने स्वतंत्रपणे लॅब उघडून बसतात तरी अशा प्रकारच्या जीव घेण्या प्रकाराची प्रकाराला आळा घालण्याकरिता भंडारा जिल्हाधिकारी साहेब यांनी स्वतंत्र भरारी पथक नेमून अनधिकृत पॅथॉलॉजी लॅब बंद कराव्यात अशी प्रकारची मागणी संपुर्ण जिल्ह्यातील जागृत नागरिक करीत आहेत महाराष्ट्र पॅरामेडिकल कौन्सिल कडे नोंदणी नसलेल्यापॅथॉलॉजी बंद कराव्यात अशा प्रकारची जनतेत रोष निर्माण होत आहे त्यामुळे आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विषयाकडे शासनाच लक्ष वेधून कारवाईची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button