Uncategorized

चंदूकाका सराफ अँड सन्स प्रा.ली. यांच्या कडून शेतकर्‍यांचा सन्मान

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) चंदूकाका सराफ अँड सन्स प्र. लि. यांच्या शाहूपुरी, कोल्हापूर येथील शोरूम मध्ये सुवर्ण पेढीमार्फत महाराष्ट्र कृषिदिनानिमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन युरेका कंपनीचे पंकज पाटील व तलाठी शुभांगी डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू रक्षा समिती महाराष्ट्रचे महामंत्री डॉ. सुरेश राठोड(पत्रकार) उपस्थित होते.
यावेळी डॉ. सुरेश राठोड म्हणाले, पारदर्शिता, शुद्धता आणि विश्वासाने भरलेली सुवर्णपेढी, पारंपारिक आणि ट्रेंडी दागिन्यांची सुवर्ण ओंजळ म्हणजे चंदूकाका सराफ होय, अशाच विश्वासाने कोल्हापूर मध्ये शेतकरी राजाचा सत्कार व कौतुक समारंभ कार्यक्रम आयोजित करणारी एकमेव पेढे म्हणजे चंदूकाका सराफ होय. जो शेतकऱ्याचा सन्मान करतो त्याच्याकडूनच आमचा शेतकरी दागिने खरेदी करेल असे आश्वासन त्यांनी दिले.
यानंतर कृषी सहाय्यक पाटील व तलाठी शुभांगी डोंगरे यांनी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करत शेतीचा कस कसा राखावा, कोणते औषध वापरावे, किती मात्रांमध्ये औषध वापरावे, शेती वरती कोणते अनुदान मिळते व त्या अनुदानाचा लाभ कसा घ्यावा याचे ही मार्गदर्शन केले.
यावेळी कार्यक्रमास चंदूकाका सराफ चे मॅनेजर, विभागीय मॅनेजर, पूर्ण स्टाफ व कोल्हापुरातील प्रत्येक गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत इव्हेंट मॅनेजर राहुल, सूत्रसंचालन चेतन चव्हाण, आभार शरयू मॅडम यांनी केले. कार्यक्रमांमध्ये प्रत्येक शेतकरी राजाला आपुलकीची शाल, श्रीफळ, आकर्षक गिफ्ट व अल्पहार देत पाहुणचार करून निरोप दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button