तासगाव येथे रविवार व सोमवारी होणाऱ्या राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण; देशभरातील शेतकरी व साहित्यिकांचा सहभाग : निमंत्रक बाळासाहेब रस्ते यांची माहिती


तासगाव प्रतिनिधी दि.२३ :
पहिले राष्ट्रीय बळीराजा साहित्य संमेलन तासगाव येथे रविवार दिनांक 26 व सोमवार दिनांक 27 जुलै रोजी राजर्षी शाहू जयंतीच्या पार्श्वभूमीवर होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष शेतीनिष्ठ विचारवंत राजकुमार घोगरे आहेत. स्वागताध्यक्ष द्राक्षगुरु सुभाष आर्वे हे आहेत. संमेलनाची तयारी पूर्ण झाली आहे. संमेलन तासगाव येथील नगरपालिकेच्या साने गुरुजी सांस्कृतिक सभागृहात होणार आहे. या संमेलनासाठी देशभरातील साहित्यिक आणि शेतकरी येणार आहेत. अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक बाळासाहेब रास्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात शेतकऱ्यांच्या प्रबोधनाचे विविध विषय परिसंवादाच्या माध्यमातून हाताळण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांन पिकलेलं विकलं गेलं पाहिजे. आणि पिकवताना त्याला कमी खर्चात टिकवता आले पाहिजे यासाठी अनेक तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या संमेलनाची संपूर्ण कार्यक्रम पत्रिका अशी.
रविवार दिनांक २६ जून २०२२ ■ सकाळी ९ वा. : राजर्षी शाहू महाराज प्रतिमा पुजन, शेती अवजारे पुजन व ग्रंथ दिंडीस सुरवात
स्थळ: सांगली नाका ते तासगांव नगरपालिका, नाट्यगृह
सहभाग: मा. रोहित (दादा) आर. आर. पाटील, मा. बाबाराजे देशमुख, पुणे,
प्रा. डॉ. बाबुराव गुरव, ह.भ.प. तुकाराम महाराज बागडे
दु. १ वा. : संमेलन उद्घाटन सोहळा
संमेलनाध्यक्ष : मा. राजकुमार घोगरे
उद्घाटक: मा. ना. विश्वजित कदमसाहेब (कृषी, सहकार राज्य मंत्री)
प्रमुख पाहुणे : पद्मश्री बीजमाता राहीताई पोपेरे प्रमुख उपस्थिती : मा. खा. संजय (काका) पाटील, मा. आ. सुमनताई पाटील
स्वागताध्यक्ष : मा. द्राक्षगुरु सुभाष (नाना) आर्वे
भोजन वेळ दुपारी २ ते २.३० वा.
पहिले सत्र वेळ : २.30 ते ४.30
विषय : मिथला घाट कि बलीराजा सभ्यता
■ वक्ते : मा. भगवान दास शर्मा (मथुरा उ. प्र.), मा. राजेश गुप्ता (दिल्ली), मा. सी. पी. महतो (रांची झारखंड), मा. राजा राम (बिहार),
मा. महेश साहु (दिल्ली), मा. संतोष कुमार (बंगाल), मा. समीर कुमार साहु ( उडीसा), मा. संजय सिंग (उत्तराखंड) सत्र अध्यक्ष डॉ. महेंद्र धावडे (नागपूर)
दूसरे सत्र वेळ सायं. ४.३० ते ६.००
■ विषय: भारतीय शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यावरील उपाय
■ वक्ते : भाई राजेंद्र कोरडे, मुंबई, राजकुमार धुरगुडे, अनिल माने, लक्ष्मण वडले.
सत्र अध्यक्ष : रघुनाथ (दादा) पाटील (सांगली)
कवी संमेलन
सहभागी कवी दंगलकार नितीन चंदनशिवे, मा. अंकुश आरेकर, स्मीता पाटील, जानराव यु. एफ. शौर्या पवार, छाया नामुगडे, सीमा कवी, रविंद्र पाटील, रमेश जावीर, मा. रविराज माने, पँथर शेषराव नेवारे.
तिसरे सत्र ९.०० ते १०.०० वा.- किर्तन सोहळा: ह.भ.प. धर्मकिर्ती महाराज, परभणीकर
■ भोजन : रात्री १० वा.
सोमवार दिनांक २७ रोजी
सकाळी ९ वा. :
ओवी बळीराजाची
सादरकर्ते : ओवीकार अर्जून थोरात व मंडळी बिरूदेव ओवीकर मंडळ, तासगांव.
दूसरे सत्र: सकाळी ९.३० ते ११.३०
विषय: महासम्राट बळीराजाची कृषी संस्कृती वक्ते : ह. भ. प. धर्मकिर्ती महाराज, परभणी, मा. प्रितीताई राऊत (नागपूर),
■ सत्र अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार, कोल्हापूर
● विशेष सन्मान सोहळा : ११.३० ते १२.००
ना. आमदार साहेबराव पाटील, अमळनेर, मा. प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार मा. नागेश चौधरी, मा. डॉ. महेंद्र धावडे, कुणबी युवा, मुंबई व सहकारी पै. महाराष्ट्र केसरी आप्पासाहेब कदम, नेले, मा. विश्वंभर सोपान बा
सत्र तिसरे: १२.३० ते २.००
विषय: शेती शेतकरी व आपल्या महामानवांचे विचारधारा व कार्य
: ■ वक्ते मा. प्रकाश तुपे (औरगाबाद), अविनाश काकडे (नागपूर) मा. दिनेश पाटील (कोल्हापूर), इंजि. नरेंद्र गद्रे (नागपूर) सत्र अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर (कासेगांव)
■- भोजन: २.30 ते 3.00
सत्र चौथे समारोप
मा. प्रशांतकुमार पाटील (कुलगुरु) महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मा. राजकुमार घोगरे (संमेलनाध्यक्ष) मा. आमदार, अरुण (अण्णा) लाड मा. वैभव (काका) नायकवडी मा. भाई दिगंबर कांबळे
मा. अरूण खरमाटे
सूत्र संचालन : विक्रांत पाटील, सुरेखा कांबळे
या संमेलनाचा सांगली जिल्ह्यातील शेतकरी साहित्यिक व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बाळासाहेब रास्ते यांनी केले आहे.