Uncategorized

काँ.शिवकुमार गणविर किसानसभेच्या राज्य अधिवेशनात महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजुर युनियन कडुन शुभेच्छा देतांना.

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क वार्ता:- “शेतकरी शेतमजुर शेती व्यवस्थेची दोन चाके काँ.शिवकुमार गणविर.” भारतीय शेती व्यवस्थेत शेतकरी व शेतमजुर हे शेती व्यवस्थेची दोन चाके आहेत.1991ला भारत सरकारनी अवलंबिलेल्या आर्थिक सुधारणा, डँकेल प्रस्ताव ,गँट करार यामुळे सध्या शेती व्यवस्था अभुतपुर्व संकटात सापडली आहे.शेती करणे आतबट्ट्याचा खेळ झालाआहे,दरवर्षी 3 टक्के शेतकरी शेतमजुर होतात,हे प्रमाण आणखी झपाट्याने वाढुन शेती व्यवस्था मुठभर भांडवलदार/कार्पोरेट घराण्याच्या घशात जाईल.तेव्हा शेतकरी शेतमजुरांना हातात हात घालुन या संकटाचा मुकाबला करावा लागेल व शासनाच्या धोरणाचे विरोधात प्रखर लढा उभारावा लागेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य लालबावटा शेतमजुर युनियनचे राज्य महासचिव काँ.शिवकुमार गणविर यांनी महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या धुळे जिल्ह्यातील शिरपुर येथे आयोजित दोन दिवसीय अधिवेशनास शुभेच्छा देतांना केले.28 व 29 मे ह्या दोन दिवसीय अधिवेशनात काँ.शिवकुमार गणविर व काँ.माधवराव बांते यांचे नेत्रुत्वात भंडारा जिल्ह्यातुन किशोर बारस्कर,दयाराम लंजे राजेश पोवनकर गजानन कठाने (साकोली) यांचेसह 15 प्रतिनीधींनी भाग घेतला.एका विशाल रैली व जाहीर सभेद्वारे अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव व स्वामीनाथन आयोगाचे सदस्य काँ.अतुलकुमार अंजान यानी अधिवेशनाचे उदघाटन केले.यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव काँ.तुकाराम भस्मे यांनी मार्गदर्शन केले तर एड.हिरालाल परदेशी हे अध्यक्ष होते. संपुर्ण महाराष्टातुन 500 च्यावर उपस्थित असलेल्या या अधिवेशनात काँ.किशोर बारस्कर (साकोली) यांनी ” पेरणी पासुन मळणी पर्यंत शेतक-यांच्या शेतीतील कामे रोजगार हमी कायद्यांतर्गत मनुष्य बळाद्वारे करण्यात यावी,तर काँ.गजानन कठाणे (विहीरगांव/कन्हाळ्या यानी गोसे खुर्द धरण प्रधिकऱणाच्या बेपर्वाईमुळे शेती पडीत राहुन होणारी नुक्सान भरपाई शासनाने द्यावी व काँ माधवराव बांते (मोहाडी )यांनी धानाला प्रति क्विंटल 3750 /- रु दर घोषित करावे आणि खरीप व रब्बी हंगामातील संपुर्ण धान शासनाने खरेदी करावे अशा आशयाचे ठराव मांडले व ते सार्वमताने मंजुर करण्यात आले.या शिवाय 29 ईतर ठराव ही मंजुर करण्यात येवुन या सर्व ठरावरुपी मागण्यांना घेऊन दि.26 जुनला छत्रपती शाहु महाराजांच्या जयंतीदिनी राज्य भर आंदोलन करण्याचे ठरविण्यात आले.शेवटी एड.हिरालाल परदेशी ( धुळे ) अध्यक्ष व राजन क्षीरसागर महासचिव असलेल्या 87 जनांची राज्य कौंसिल निवडण्यात आली तर भंडारा जिल्ह्यातील काँ.माधवराव बांते व किशोर बारस्कर यांची 25 सदस्यीय राज्य कार्यकारिणीत निवड करण्यात आली.

●पोलीस कि आवाज●न्युज दररोजपाहण्यासाठी ग्रुपमध्ये जाईन व्हा व नवनवीन बातम्या बघा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button