साकोली येथे अवैध रेती वाहतुक…

साकोली वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सासरा येथील चुलबंद नदी पात्रातून कोणतीही परवानगी न घेता शासकीय रेती चोरी करतांना आरोपी जिवन चाचेरे रा. खंडाळा रा. साकोली, दिपक चांदेवार रा. सासरा ता. साकोली त्यांच्या ताब्यातून पाॅवरट्रक कंपनी चा पिवळ्या रंगाचा अशोक- ले- लॅंन्ड कंपनी चा मिनी ट्रक मौजा गुळेघा रस्त्यावर मिळुन आले. ट्रॅक च्या डाल्यात 2 ब्रास रेती किंमत 11,000/- रु. आणि मिनी ट्रक ची किंमत 22 लाख अशी एकूण 22 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळुन आल्याने आरोपी विरुद्ध कलम 305(ई) 49 भा. न्या. स. अन्वये सदर चा गुन्हा नोंद करण्यात आला.>

अश्याच कित्येक अवैध रेती वाहतूक चुलबंद नदी पात्रातून अवैध रेती सासरा येथुन उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळत आहे. पोलीसांनी योग्य कार्यवाही करुन शासनाचा राजस्व वाचेल असी उपाययोजना करावी व अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रण ठेवावे.



