पुणे जिल्हा वगळता महाराष्ट्र मध्ये आर .टी.ई. अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेमध्ये सावळागोंधळ– डॉ .शंकर पवार
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा वगळता आर .टी .ई .अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया मध्ये सावळागोंधळ असल्याचा आरोप जीवन आधार फाउंडेशन रेस्क्यू फोर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पोवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, पंतप्रधान, केंद्रीय शिक्षण मंत्री, यांना पाठवलेल्या ईमेल मध्ये केलेला आहे .पुणे जिल्हा वगळता महाराष्ट्र राज्य मध्ये आरटीई अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र मध्ये सर्वसामान्य विद्यार्थी साठी प्राइवेट एडमिशन घ्यायचे खूप वाईट परिस्थिती आहे .गोर गरीब लाखो रुपये कुटून आणणार? RTE कन्सेप्ट चांगला आहे. पण तो नियोजन बद्ध नाही, सद्या 2 तारखा चेंज झाल्या. त्यामध्ये पण विलंब! शिक्षण विभाग झोपले असे वाटते? आणि पोर्टल अपडेट नाही . डॉक्टर शंकर पोवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पासुन गट शिक्षण अधिकारी याना कॉल केला. पण कोणताच रिप्लाय नाही .हीच परिस्थिती अत्यंत निंदनीय आहे .आपल्या महाराष्ट्र मध्ये आर. टी. ई . ला कित्येक पालकांनी ऑनलाइन फ्रॉम भरला आहे.
मी अर्जाची स्थिठी दररोज बघितल्यानंतर असे लक्षात येते की अत्यंत
गरीब आणि गरजू शेतकरी याची मुल आणि ज्यांना आपेक्षा आहे असे याची आतुरतेने वाट पाहत आहेत .कारण एकीकडे एडमिशन नाही भेटले तर कुठेच एडमिशन भेटणार नाही. कारण त्या ठिकाणी सर्व एडमिशन पूर्ण झालेली असतात. प्लिज गोर गरीब याना त्रास होईल अस या छत्रपती शिवाजी ,शाहू महाराज , डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यात होऊ नये असे वाटते .परिस्थिती खूप गंभीर आहे याचा लवकर विचार करावा जर अस नाही झाल तर मी आणि महाराष्ट्र मधील बांधव व भगिनी याचा नक्की निशेद्ध केल्याशिवाय राहणार नाही.
*पोलीस कि आवाज* न्युज नेटवर्क चे नियमित वाचक बना संपर्क-9765928259