पोलीस स्टेशनला मोटार सायकल चोरी उघडकीस आली…
महाराष्ट्राचा नबर 1 नन्युज चॅनल/नेटवर्क
पोलीस कि आवाज
तुमसर वार्ता:-तुमसर तालुक्यात मोटार सायकल चोराची घटना खुप जोरात सुरु होत्या.
तुमसर पोलीस स्टेशन चे ठाणेदार संजय गायकवाड यांनी मोटर सायकल चोरी ची घटना बघून यांनी तुमसर पोलीस यांच्या साहाय्याने गोपनीय माहिती च्या आधारे मौजा पाथरी तालुका गोरेगाव जि. गोंदिया येथील रहिवासी वाल्मिक ऊर्फ बालु लोकचंद हरिणखेडे ह्या ४२ वर्षाचा मनुष्य , ह. मु. बिड गणेशपुर ता. हिंगणा जि. नागपूर चा शोध लागला असताना व त्याला ताब्यात घेऊन बारकाईने विचारपूस केली असता त्याने २ फरवरी ला तुमसर परिसरातील MH-36 p 8086 मोटार सायकल चोरी केल्याचे कबूल केले. त्या गुन्हे मुळे तुमसर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींला जास्त विचारपुस दरम्यान बाकी मोटार सायकल हे दुर्ग रायपूर (छत्तीसगढ) येथुन चोरून आनुन माझी स्वतः ची घाडी आहे असे सांगितले व कागदपत्रे नंतर आणुन देतो असे परिसरात लोकांना विक्री करतांना सांगितले.
( असीच कार्यवाही प्रत्येक गुन्हे वर करने अपेक्षित आहे.)

प्रकटीकरण गुन्हे शाखा व तुमसर पोलीस स्टेशन ने बालु हरिनखेडे याला ताब्यात घेतले व ह. मु. बिड गणेशपुर (बुटीबोरी) ता. हिंगना जि. नागपुर ह्या दोन्ही आरोपी ला ताब्यात घेतले व तुमसरातील १ व इतर ७ मोटार सायकल ताब्यात घेऊन अशा ८ मोटार सायकल ताब्यात घेऊन २,९०,०००/- रु. मुद्देमाल जप्त केला व त्यांच्या वर ५४/२०२५ अन्वये ३०३ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

पुढील तपास भंडारा जिल्हा चे पोलीस अधीक्षक मा. नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संजय गायकवाड व त्यांचे सहकारी कर्मी करत आहेत.




