प्रहार दिव्यांग संघटना कार्यालय खापा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली
खापा(तुमसर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जगभरात उत्साहात साजरी केली जाते याचच अवचित्य साधून दिव्यांग संघटना तुमसर तालुका कार्यालय खापा येथे दिव्यांग संघटना तुमसर तालुका व परमात्मा एक मानव विकास यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटीका सौ. किर्तीताई राजेंद्र पिकलमुंडे (सरपंच खापा) अध्यक्ष डॅा. मनोजकुमार नंदेश्वर (पशुवैद्यकीय अधिकारी), डॅा. थोरात (पशुवैद्यकीय अधिकारी),राजेंद्रभाऊ पिकलमुंडे सामाजिक कार्यकर्ता, सौ. माटे ताई ग्रा.सदस्या, रोशन मने ग्रा. सदस्य,बुराडे मॅडम अंगणवाडी सेविका, डॅा, सोनवानेजी,टवरचंद हाडगे प्रहार सेवक, कोडवतेजी प्रहार सेवक,रविचंद गणविर, तसेच दिव्यांग बांधव,निराधार बांधव,अंगणवाडी विद्यार्थी, तसेच खापा येथील गावकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेषराव गाणविर (प्रहार दिव्यांग क्रॅांती संघटना तुमसर तालुका प्रमुख) यांनी केले. आभार प्रदर्शन (परमात्मा एक मानव विकास च्या पदाधिकारी यांनी केले.
