सावित्रीबाईंमुळे स्त्री-मुक्तीचा मार्ग प्रशस्त-श्रीमती पी. ए. राजपूत सहदिवानी न्यायधीश

पोलीस कि आवाज न्युज
तुमसर : “सावित्रीबाई फुले यांच्या खरतर संघर्षातूनच भारतात स्त्री-मुक्तीचा मार्ग प्रशस्त होऊ शकला. महामानवांच्या अथक प्रयत्नातूनच व्यापक ध्येय असलेले कायदे तयार होऊ शकले. म्हणूनच आज कायद्याने सर्व नागरिकांचे अधिकार आणि कर्तव्ये समान आहेत.” असे प्रतिपादन तुमसर न्यायालयातील सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती पी. ए. राजपूत यांनी केले.

गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास मोर कला, वाणिज्य व श्रीमती गोदावरीदेवी सराफ विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नुकतीच ‘लिंगभाव समानता व कायदेविषयक जनजागृती कार्यशाळा’ घेण्यात आली. या कार्यशाळेचे प्रमुख अतिथी म्हणून तुमसर
न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्री जे. आर. घाडगे तसेच सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती पी. ए. राजपूत
हे उपस्थित होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे नवनियुक्त कार्यकारी प्राचार्य डॉ के. एन. साठवणे हे उपस्थित होते.

‘बालक स्नेही कायदेविषयक सेवा’ या विषयावरील आपल्या भाषणात श्रीमती राजपूत यांनी, कायद्यानुसार स्त्री पुरुष तृतीयपंथीय या सर्वांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण केले जाते. तसेच अल्पवयीनांच्या संरक्षणाबाबतही न्यायालये विशेष काळजी घेत असतात, याबाबत माहिती दिली. याप्रसंगी श्री जे. आर. घाडगे म्हणाले की, “समाजात कायद्यासंदर्भात साक्षरता निर्माण व्हायला हवी. जेणेकरून समाजात शांतता व सौहार्द नांदेल. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. के. एन. साठवणे यांनी कायद्यासंदर्भातील सतर्कता व तरुणांची जबाबदारी या विषयावर प्रकाश टाकला.

या कार्यशाळेमध्ये ॲड. दीपक रावलानी यांनी ‘मुलींवरील हिंसेचे उच्चाटन’ (Elimination of violence against girl child) तसेच POCSO या कायद्यासंदर्भात माहिती दिली.
ॲड.विलास माटे अध्यक्ष वकील संघ
यांनी ‘वाहतूक सुरक्षितता’ या विषयावर तर ॲड. सूर्यवंशी यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या विषयावर प्रकाश टाकला. या कार्यशाळे दरम्यान वाचन कौशल्य उपक्रमाअंतर्गत भरविण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनास प्रमुख अतिथींनी भेट दिली.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख रेणुकादास उबाळे यांनी केले अमोल खांदवे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ भारती काटेखाये यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यशाळेच्या यशस्वितेकरिता डॉ राजेश दिपटे, डाॅ व्यंकटेश मोरे, प्रा लक्ष्मण पेटकुले, डाॅ गोल्डी बघमार, डाॅ जयंत कुमार मस्के, डॉ राजेंद्र बेलोकार, डॉ अरुणा बावनकर, सुनीता राठोड, डॉ जगन्नाथ गडपायले, लता खंडाईत व डॉ विजय चौधरी आदींनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी न्यायालय कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.