Uncategorized

“लाडका भाऊ योजना”: बेरोजगार तरुणांच्या हक्कासाठी इनसानियात फाऊंडेशनचा प्रभावी पुढाकार!तुमसरच्या तरुणांचा बंड – ‘लाडका भाऊ योजना अंतर्गत प्रशिक्षण ३ वर्षे वाढविण्याची जोरदार मागणी

“सुधारणा ही केवळ मागणी नाही, तर तरुणांच्या हक्काचा प्रश्न आहे!”
त्यांनी सांगितले की, या सुधारणा तातडीने लागू झाल्यास राज्यातील तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी मिळतील आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीला चालना मिळेल.

तत्काळ सुधारणा होणार का?
फाऊंडेशन व प्रशिक्षणार्थीच्या प्रयत्नांमुळे प्रशासन जागे होईल का, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि कौशल्यविकास योजनेत सुधारणा करण्यासाठी प्रशासनाने आता तातडीने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

या निवेदन सादरीकरणावेळी इनसानियात फाऊंडेशनचे सदस्य आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फाऊंडेशन चे अध्यक्ष अनिकेत डोंगरे, हर्षल मलेवर (सहसचिव), पंकज चौरसिया (सदस्य), कुणाल भोयर (सदस्य), प्रगती रहंगडाले (को-ऑर्डिनेटर) यांचा समावेश होता. तसेच प्रशिक्षणार्थी राहुल डोंगरे, देवेंद्र गिरडकर, अंकित लांजेवार, विजेंद्र महाकाळकर, शुभम देशकर, अमित दमाहे, अश्विनी अतकरी, आरती रहंगडाले, रोहिणी अंबुले, विश्वकला कुकडे, विकी बिरणवारे, योगेंद्र उमरकर, जयंत बघेले, दीपांशू पांडे, आचल वैद्य, दिव्या कटरे, हितीक्षा शिवणकर, राहुल तितिरमारे, तुषार गणविर, ललित मेहर, रोशनी सार्वे, प्रियंका जांगळे, आरती रहंगडाले यांसारख्या तरुणांनी आपला सहभाग नोंदवला.

“तरुणांचा आवाज आता प्रशासनाच्या दरवाजावर ठोठावत आहे. ही सुधारणा त्यांचं भविष्य बदलू शकते!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button