आता ग्रामपंचायत च्या कार्यवाही ला सुरुवात…

तुमसर तालुका वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सितासावंगी ग्रामपंचायत मध्ये विविध कामामध्ये घोळ झाल्याची माहिती समोर आली आहे. कित्येक दिवसापासून गावकरी तक्रार देत असुन त्यांच्या तक्रारी कडे अधिकारी काणाडोळा करत असल्याची माहिती पुढे येत आहे असे गावकऱ्यांनी पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला सांगितले.तक्रारीची चौकशी पुर्ण होईपर्यंत कोणत्याही ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी/अधिकारी यांची बदली होऊ नये अशी तक्ररदाराची मागणी आहे.

परंतु आता
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ही बातमी उघडकीस केल्याशिवाय गप्प बसणार नाही.
कित्येक अधिकाऱ्यांनी ह्या कामाच्या घोळ प्रसंगी बदली केल्याचे समोर आले आहे
परंतु ही घोळ कामे त्या अधिकाऱ्यांच्या काळातील असल्यामुळे ही कार्यवाही फक्त त्या अधिकाऱ्यांवर होईल ही बाब त्यांनी विसरु नये.
कामाचे प्रकार जसे सिमेंट रस्ते, शोक फीट खड्डे, मॉईल फंड, दलित वस्तीतील कामे, नाली सफाई ईत्यादी कामाची निष्पक्ष चौकशी होने ही गावकऱ्यांनी व तक्रारदाराची मागणी असल्याची तक्रार गटविकास अधिकारी पंचायत समिती तुमसर व उपविभागीय अभियंता (बांधकाम) उपविभाग तुमसर जि. प. भंडारा यांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले.
बातमी प्रकाशित होताच नवीन गटविकास अधिकारी तुमसर हे कोणती कार्यवाही करतात ह्याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित आहे.
( विस्तृत जाणकारी पुढल्या अंकात)