Uncategorized

आरसेटी द्वारा शिवनकला चा निशुल्क प्रशिक्षण

सुधारित बातमी दिनांक : 13 मे 2022

आरसेटीव्दारा शिवणकामाचे निशुल्क प्रशिक्षण

भंडारा, दि. 13 : पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार बॅंक ऑफ इंडिया प्रायोजित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था द्वारे शिवणकाम प्रशिक्षण वर्गाचे आयोजन 20 मे 2022 पासून करण्यात येत आहे. 30 दिवसीय प्रशिक्षणात शिवणकाम व्यवस्थापन, मुलांचे शर्ट पँन्ट, सलवार सूटचे प्रकार, कुर्तीचे प्रकार, गाऊन्सचे प्रकार, साडी मेकिंग, पिको फॉलचे प्रकार, कर्जविषयक मार्गदर्शन, उद्योजकीय कौशल्य, व्यक्तिमत्व विकास, प्रकल्प अहवाल, व्यवसायातील संधी, बाजार सर्वेक्षण, बॅंकेच्या योजना, जसे मुद्रा, पीएमईजीपी, सीएमईजीपी, स्टॅंड अप इंडिया व वित्तीय योजनांची माहिती दिली जाईल.

स्वयंरोजगाराची आवड, व्यवसाय करण्याची तयारी, वय 18 ते 45 वर्षे, शिक्षण 10 वी पास किंवा नापास, भंडारा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या बेरोजगार महिलांनी मुलाखतीकरिता 19 मे 2022 ला सकाळी 9:30 वाजता स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, लाल बहादूर शास्त्री शाळेच्या बाजूला, साखरकर सभागृह समोर, महाबोधी बुद्धविहाररासमोर, शास्त्री चौक, भंडारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संस्था संचालक मिलिंद इंगळे यांनी केले आहे. प्रशिक्षण प्रवेशासाठी आयोजित मुलाखतीकरिता येतांना उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, आधारकार्ड व 4 फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच या प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थ्यांना जेवण, चहा, नाश्ता, वह्या-पुस्तके, राहणे आदींची सोय मोफत केली जाईल.

अधिक माहितीकरीता 8669028433, 9511875908, 9766522984 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.

00000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button