Uncategorized
विशेष सभेसाठी ओळखपत्र आणावे-जिल्हाधिकारी संदीप कदम
◆विशेष सभेसाठी ओळखपत्र सोबत आणावे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन ◆
भंडारा, दि. 9 :पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरिता मंगळवार 10 मे रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष सभेस सर्व जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सभापतींना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र यासाठी उपस्थित राहतांना जि. प. सदस्य व पं. स. सभापतींना त्यांच्याकडील ओळखपत्र तपासूनच प्रवेश देण्यात येईल. तरी या विशेष सभेसाठी येतांना फोटो असलेले ओळखपत्र वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, पासपोर्ट, आधारकार्ड इत्यादी सोबत आणावे, असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी कळविले आहे.