Uncategorized

रविवारी भंडारा जिल्यात शुन्य बाधित

रविवारी जिल्ह्यात शून्य कोरोना बाधित

• एकूण डिस्चार्ज 66768

• एकूण पॉझिटिव्ह 67910

• क्रियाशील रुग्ण 00

• आज मृत्यू शून्य

• एकूण मृत्यू 1142

• रिकव्हरी रेट 98.32 टक्के

• मृत्यू दर 01.68

• आजच्या टेस्ट 395

• एकूण टेस्ट 593781

भंडारा, दि. 8 : जिल्ह्यात रविवारी शून्य कोरोना बाधित रुग्ण आढळले असून आज (दि.8) बरे झालेल्या रुग्णांची संख्याही शून्य आहे. रविवारी 395 व्यक्तींची चाचणी केली असता एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आता एकही सक्रिय रुग्ण नाही.

आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 66 हजार 768 आहे तर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 67 हजार 910 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.32 टक्के आहे. आतापर्यंत 05 लाख 93 हजार 781 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात 67 हजार 910 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये भंडारा तालुक्यातील 00, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदूर तालुक्यातील 00 व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1142 आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

नागरिकांना आवाहन

·         कोरोनावर सध्यातरी लस हाच एकमेव उपाय असून पात्र नागरिकांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लस अवश्य घ्यावी.

·         जे लाभार्थी दुसरा डोस घेण्यासाठी पात्र ठरले आहेत, त्यांनी लसीचा दुसरा डोस प्राधान्याने घ्यावा.

·         कोविड वर्तणूक नियमावलीचे पालन करावे, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा.

00000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button